शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : जुई गडकरीने घरीच बनवला चिवडा, रेसिपीही सांगितली, म्हणाली, “कर्जतला जेव्हा पहिला पाऊस पडायचा तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 13, 2023 | 6:58 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
jui gadkari shared special video

jui gadkari shared special video

‘ठरलं तर मग’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुई या मालिकेमुळे सध्या बरीच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेत जुईने सायली हे प्रमुख पात्र साकारलं आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील चालू घडामोडींचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर बराच पसंतीस पडत आहे. ( jui gadkari shared special video)

नुकताच तिने तिच्या आजीच्या आठवणीत एक खास पदार्थ बनवला. तो पदार्थ बनवतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो पदार्थ बनवताना तिने आजीच्या आठवणी सांगितल्या आहेत. तो खास पदार्थ म्हणजे चिवडा. तिची आजी तिच्यासाठी कसा चिवडा बनवायची या मागच्या आठवणी त्याने या पोस्टमधून शेअर केला आहे. तिने चिवडा बनवताना संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – “एक स्वप्न पूर्ण…” महेश मांजरेकरांसाठी भूषण प्रधानची खास पोस्ट, म्हणाला, “प्रत्येक दिवशी मी…”

या व्हिडिओला ती कॅप्शन देत म्हणाली, ‘आजीची आठवण आली की, तिच्या हातचे पदार्थ आठवतात. कर्जतला जेव्हा पहिला पाऊस पडायचा तेव्हा आजी आम्हा भावंडांना गरम गरम चिवडा लगेच बनवून द्यायची. तिच्या हातची चव याला नक्की नाही. परवा खूप पाऊस झाला. तेव्हा मला तिची खूप आठवण येत होती. म्हणून तिच्या आठवणीत मी हा चिवडा बनवला. तुम्ही पण नक्की ट्राय करा’, असं म्हणत तिने आजीच्या आठवणींना उजाळा दिला.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

आणखी वाचा – मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, लग्न करुन परदेशात गेली अन्…

जुईने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने, ‘मी नोकरीला जायचे तेव्हा माझी आई मला बनवून द्यायची. आता मी माझ्या मुलांना संध्याकाळच्या नाष्ट्याला बनवून देते’, असं म्हणत नेटकऱ्याने स्वतःच्या आठवणींना उजाळा दिला. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘आजीचा स्पेशल टचची कमतरता आहे पण धन्यवाद तु शेअर केलं त्यासाठी’ असं म्हणत तिच्या व्हिडिओवर कमेंट केला आहे.

Tags: chivada recipemarathi serialshared special videoTharala tar mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ashok Saraf in Saregamapa Lil Champs

Video : …अन् अशोक सराफ यांना रडू कोसळलं, ‘सारेगमप’च्या मंचावर नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.