‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला नुकतच पितृशोकाचा सामना करावा लागला. एक महिन्यापूर्वी म्हणजेच १२ ऑगस्टला तिचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन झालं. त्यांनी ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वडिल्याच्या निधनानंतर तिला खूप मोठा धक्का बसला आहे. तिचं वडिलांबरोबर खूप घट्ट नातं होतं. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या वडिलांसंबंधीत पोस्टवर चाहत्यांकडून नेहमी प्रेम मिळायचं. नुकतीच वडिलांच्या आठवणीत अंकिताने एक महिन्याच्या पुण्यतिथीनिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Ankita lokhande remembers her father every moment)
अंकिताने तिच्या सोशल मीडियावर तिच्या वडिलाबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला. त्यात तिने एक भावनिक पोस्ट लिहीत वडिलांची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, “पा आम्हाला विश्वास बसत नाही की आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला. प्रत्येक क्षणाला तुमची खूप आठवण येते. बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी तुम्हाला पुन्हा भेटेपर्यंत स्वतःची काळजी घ्या”. अंकिताने केलेली ही भावनिक पोस्ट बरीच व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनीही या पोस्टवर कमेंट करत तिला सांत्वन दिलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘मला माहित आहे की तु किती वेदनेत आहे. मला अजूनही माझ्या आजीची आठवण येते. मार्चमध्ये ती मला सोडून गेली. अजूनही विश्वास बसत नाही’. दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, ‘त्यांचा नेहमी तुमच्यावर प्रेम व आशीर्वादांचा हात राहील. काळजी घे अंकिता’.
आणखी वाचा – ‘जवान’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पण मोडू शकला नाही ‘गदर २’चा ‘हा’ रेकॉर्ड
अंकिताच्या वडिलांचं वयाच्या ६८व्या वर्षी निधन झालं. अंकिताने तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या काही आठवड्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. तिचे वडील आजारी आहेत व त्यांच्यावर विशेष उपचार सुरु असल्याचं तिने यावेळी म्हटलं होतं. तिने फादर्स डे दिवशी लिहीलेली पोस्ट बरीच चर्चेत होती. त्यात तिने आपल्या वडिलांसाठी भला मोठा मजकूर लिहीला होता. तिच्या आयुष्यातील तिचे पहिले हिरो हे तिचे बाबा आहेत असंही तिने त्यात म्हटलं होतं.