बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘जवान’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पण मोडू शकला नाही ‘गदर २’चा ‘हा’ रेकॉर्ड

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 12, 2023 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Jawan box office collection on monday

Jawan box office collection on monday

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत आहे. या चित्रपटाचं आतापर्यंत एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ३१६ कोटी रुपये इतके आहे. त्याबरोबर २०२३ मधील ३०० कोटींच्या पल्ला गाठणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. याअगोदर हे विक्रम शाहरुखच्याच ‘पठाण’ चित्रपटाने तर सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटांनी आपल्या नावावर केले होते. किंग खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या आकड्यांवरून तर चित्रपट प्रेक्षकांच्या बराच पसंतीस पडत असल्याचं दिसून येत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सोमवारी केलेल्या कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. (Jawan box office collection on monday)

‘जवान’ चित्रपटाने अवघ्या चार दिवसात इतर चित्रपटांना मागे टाकत बरीच कमाई केली आहे. अजूनही सिनेमागृहात चित्रपट पहायला प्रेक्षकांची गर्दी दिसून येत आहे. रविवारी रद्द झालेला भारत-पाकिस्तानचा सामना सोमवारी खेळवला गेला. पण तरीही या दोन दिवसांतही सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची बरीच गर्दी पहायला मिळाली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा – मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, लग्न करुन परदेशात गेली अन्…

रविवारच्या दिवशी ८०.१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ज्यात सर्वाधिक ७१.६३ कोटी रुपयांचं कलेक्शन हिंदी भाषेत, ५ कोटी तामिळ भाषेत तर ३.४७ कोटी तेलुगू भाषेत कमाई केली. नुकतीच जवानची सोमवारचीही आकडेवारी समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या नातवाचं बारसं थाटामाटात पार, पाहा शाही सोहळ्याची खास झलक

जवान चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या सोमवारी पाचव्या दिवशी तब्बल ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. याबरोबरच जवानचं एकून पाच दिवसांचं कलेक्शन ३१६.१६ कोटी रुपये इतक झालं आहे. अवघ्या ५ दिवसात ३०० कोटींचा टप्पा गाठत २०२३मध्ये ३०० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपलं नाव नोंदवलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा – “तू मोठी झालीस पण…”, मिताली मयेकरच्या वडिलांची लेकीसाठी भावुक पोस्ट, म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी तू…”

२०२३ मध्ये यापुर्वी ‘गदर २’ चित्रपटाने हा टप्पा गाठला होता. ‘जवान’ चित्रपटाने आतापर्यंत बरेच रेकॉर्ड मोडलेत पण तरीही तो ‘गदर २’ चित्रपटाचं रेकॉर्ड तोडू शकला नाही. ‘जवान’ने जरी चांगलीच कमाई केली असली तरीही पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘गदर-२’ चित्रपटाचं रेकॉर्ड मोडू शकला नाही. ‘गदर २’ने पहिल्या सोमवारी ३८.७ कोटी रुपयांची कमाई केली होती. पण हे रेकॉर्ड तोडलं गेलेलं नाही. मात्र शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाने स्वतःच्याच ‘पठाण’ चित्रपटाचे रेकॉर्ड तोडलं आहे. पहिल्या सोमवारी ‘पठाण’चं कलेक्शन २६.५ रुपये इतकं होतं.  

Tags: bollywood moviebox office collectionday 5earns 30 crorejawanon Monday collectionshahrukh khan film
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Social Media Star Incident

"…म्हणून मला नग्न केलं", मराठी सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, "ते खूप अपमान…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.