छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे झी मराठी वाहिनीवर सध्या सुरु असणारा खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम. गायक अवधूत गुप्ते याचा हा कार्यक्रम असून आजवर या कार्यक्रमाने साऱ्या रसिक प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे राजकारणी आले. त्यामुळे मध्यंतरी हा कार्यक्रम ट्रोल होत होता. या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त राजकारण्यांनाच बोलवलं जातं असं म्हणत काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. (Avdhoot Gupte Troll)
त्यांनतर मात्र या कार्यक्रमामध्ये कलाकार मंडळींना बोलावून ही बाजू सांभाळली गेली. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे , वंदना गुप्ते यांसारख्या कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आता मात्र कार्यक्रमाचा दर्जा खालवला असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी कार्यक्रमाला उचलून धरलं आहे.
कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये राजकारणी अभिजीत बिचुकले पाहुणे म्हणून उपस्थिती लावताना दिसणार आहेत. परंतु त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं प्रेक्षकांना आवडलेलं दिसत नाही. कार्यक्रमाचा नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये अभिजित बिचुकले यांनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये अवधूत गुप्तेला उत्तर दिली असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी नाराजी दर्शविली आहे. त्यांना या कार्यक्रात बिचुकले आलेले काही आवडलेलं नाही. नेटकऱ्यांनी व प्रेक्षकांनी कमेंट करत नाराजी दर्शविली आहे.
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “अर्रर…किती वाईट दिवस आले आहेत गुप्तेवर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कार्यक्रमाचा दर्जा घालवू नका.” तर आणखी एकाने लिहिलं आहे की, “डोक्यावर पडले आहेत का झी वाले!?” तर एका युजरने कामनेत करत म्हटलं आहे की, “गुप्ते तुम्ही शो सोडून द्या…” अशाप्रकारे अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अवधूत गुप्ते व या कार्यक्रमाला ट्रोल केलेलं पाहायला मिळतंय.