मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. शुक्रवारी (२ ऑगस्ट) ही घटना घडल्यानंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या लाठीचार्जनंतर संपूर्ण राज्यभरात यावर प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीनेही सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
बरीच कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे विविध विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. राजकीय तसेच सामाजिक विषयांवर उघडपणे भाष्य करण्यास कलाकार पुढे सरसावतात. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. शिवाय काम सांभाळत ती सामाजिक कामांमध्ये अधिक हातभार लावते.
आणखी वाचा – “माझ्या मुलीला बघून एकाची लाळ गळत होती अन्…”, अतिशा नाईकचा खुलासा, म्हणाली, “छेड काढली…”
जालनामध्ये झालेल्या लाठीचार्जबाबत तिने केलेली पोस्ट सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तिने एक पोस्ट शेअर केली. अश्विनी म्हणाली, “मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज… का? कशासाठी?”. अश्विनीने झालेल्या लाठीचार्जनंतर संताप व्यक्त केला. शिवाय हा लाठीचार्ज का व कशासाठी करण्यात आला असा संतप्त प्रश्नही विचारला.

२९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहा जण आंदोलनाला बसले. पण प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा होऊनही पुढे कोणताच निर्णय झाला नाही. दरम्यान याचं रुपांतर वादामध्ये झालं. या वादात पोलीसांनी उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज केला. कलाक्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रामधून या घडलेल्या घटनेबाबत भाष्य करण्यात येत आहे.