atisha naik daughter : अभिनेत्री अतिशा नाईक यांनी अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटनांचा, आठवणींचा खुलासा त्यांनी इट्स मज्जाच्या नव्याकोऱ्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात केला आहे. लहानपणीपासून ते करिअरच्या महत्वाच्या टप्प्यापर्यंत आलेले अनुभव अतिशा नाईकने या अड्ड्यावर शेअर केले. दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तर देताना अतिशाने मुलीसोबत घडलेला एक किस्सा देखील सांगितला.
अतिशा नाईक सोबत रंगलेल्या या गप्पांमध्ये तिच्या मुलीचा विषय निघाला तेव्हा मुली सोबत फिरत असताना घडलेला एक भयंकर प्रकार या वेळी अतिशाने सांगितला अतिशा म्हणाली “मी माझ्या मुलीच्या कोणत्याही गोष्टींमध्ये लुडबूड करत नाही. तिला हवं ते करण्याची मुभा आहे. तुला जे वापरायचं आहे ते वापर पण त्यावरून जर कोणी तुमचा छळ केला, कोणी छेड काढली तर बाई म्हणून त्याचा प्रतिकार करण्याची ताकद तुमच्याकडे आहे का? ती असेल तर कशातही तुम्ही कम्फरटेबल राहू शकता.(atisha naik daughter)
हे देखील वाचा – “पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर बाबांजवळ गेले अन्…”, अतिशा नाईकने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्यांनी मला कधीही…”
“खरं सांगू का मी माझ्या मुलीसोबत एकदा बाहेर गेले असताना अक्षरशः एकाची लाळ गळत होती तिच्याकडे बघून मी त्याला म्हणाले पण आरे बाबा तिच्याकडे बघण्यापेक्षा पुढे बघ खड्डा आहे पडशील. पण म्हणून मी कोणालाही संगु शकत नाही तू हेच कर असाच रहा. कारण तो त्यांचा स्वातंत्र्य निर्णय आहे. म्हणून मी तिला पूर्णपणे मोकळीक दिली आहे. त्यामुळे मी तिला सांगत नाही काय कर आणि काय करू नको”(atisha naik movies and tv shows)