शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यानंतर बाबांजवळ गेले अन्…”, अतिशा नाईकने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “त्यांनी मला कधीही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 2, 2023 | 9:33 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
atisha naik on her first period

atisha naik on her first period

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा तिच्यात खूप बदल होत असतात. त्या काळानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं. ते बदल मानसिक असतात तसेच ते शारिरीकही असतात. या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मासिक पाळी. या टप्प्यात तिला समजून घेणं, समजून सांगणं खूप महत्त्वाचं असतं. हा काळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येतो. तेव्हा तिच्या आयुष्यात महत्त्वाची व्यक्ती असणं गरजेचं असतं जी त्यावेळी तिचा सार्थी बनेल. असाच एक स्वतःच्या आयुष्यातील त्या परिस्थितीतील सार्थीचा किस्सा अभिनेत्री अतिशा नाईकने सांगितला आहे. तिच्या आयुष्यातील या परिस्थितीतील सार्थी कोण ठरलं हे तिने ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.(atisha naik on her first period)

अतिशा बरीच वर्ष मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. तिने आजपर्यंत विविध भूमिका साकारल्या. अभिनय क्षेत्रात भूमिका साकारत असताना त्यांनी नेहमीच आपले विचार परखडपणे मांडले आहेत. असंच तिने आता स्वतःच्या आयुष्यात घडलेला पहिल्या मासिक पाळीबाबतचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “मी सगळ्या गोष्टींसाठी माझ्या बाबांवर पूर्णपणे अवलंबून होते. अगदी कोणतीही गोष्ट सांगयची असली तरीही ती अगोदर जाऊन मी त्यांना सांगायचे. कारण त्यांनी नेहमी मला समजून घेतलं. त्यांनी मला कधीही जज केलं नाही”.

वाचा – काय म्हणाले अतिशाचे बाबा?(atisha naik on her first period)

आणखी वाचा – …म्हणून अतिशा नाईकने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका अर्धवट सोडली, म्हणाली, “आई खूप आजारी होती आणि…”

पुढे ती म्हणाली, “त्यामुळे माझी जेव्हा पहिली मासिक पाळी आली तेव्हा त्याबद्दल मी पहिलं त्यांना सांगितलं. मी त्यावेळी खूप घाबरले होते. मला समजत नव्हतं मी काय करावं? मला कळेना नेमकं काय झालं आहे? काय करायचं मी? त्यावेळी ही गोष्ट मी बाबांना सांगितली. कारण त्यांच्याबरोबरचं नातं खूप घट्ट होतं”. पुढे ती म्हणाल्या, “याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. याला मासिक पाळी किंवा पिरिएड्स म्हणतात याबद्दलही मला कोणतीही माहिती नव्हती. कारण त्यावेळी आम्हाला याचं शिक्षण दिलं जात नव्हतं. आता हे शिक्षण दिलं जातं ही खूप चांगली गोष्ट आहे”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “माझ्या मुलीला बघून एकाची लाळ गळत होती अन्…”, अतिशा नाईकचा खुलासा, म्हणाली, “छेड काढली…”

पुढे त्या म्हणाल्या, “मी बाबांना सांगितल्यावर बाबा म्हणाले की,  हे असंच होतं. पण मी याबद्दल तुला खूप काही सांगू शकणार नाही. आई तुला सगळं नीट समजावेल. त्यांनी मला हे सांगणं सहाजिकच होतं. पण जो नात्यात विश्वास गरजेचा असतो तो विश्वास आमच्यात होता. हा विश्वास सगळ्या नात्यात असणं गरजेचं आहे. मग ते नातं आई-वडिलांबरोबरचं, मित्र-मैत्रिणीबरोबर, भाऊ—बहिणीबरोबर असो अगदी शेजाऱ्यांबरोबरसुद्धा एक नातं असतं ते विश्वासाचं नातं असणं महत्त्वाचं आहे”. अतिशाच्या बोलण्यामधून तिचं वडिलांवर किती प्रेम होतं हे दिसून आलं.

Tags: atisha naikfirst period experienceinterview viralmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
atisha naik daughter

"माझ्या मुलीला बघून एकाची लाळ गळत होती अन्…", अतिशा नाईकचा खुलासा, म्हणाली, "छेड काढली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.