बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झाला होता. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे याही भागाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. आणि बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करताना दिसत आहे. सध्या चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी तो थांबलेला नाही. सनी देओल या यशाचा आनंद घेत आहेत. २००१ मध्ये ‘गदर : एक प्रेमकथा’ प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी आमिर खानचा ‘लगान’ सुद्धा प्रदर्शित झाला होता. असं असूनही चित्रपट सुपरहिट ठरला होता. मात्र, गदर सारखा सुपरहिट चित्रपट देऊनही सनी देओलला काम मिळत नव्हते. नुकतेच एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. (Sunny Deol)
सनी देओलने नुकताच ‘बीबीसी यूके’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने ‘गदर : एक प्रेम कथा’ चित्रपटानंतरच्या संघर्षाचा काळाची आठवण सांगितली. सनी म्हणाला, “गदरपूर्वी मला कोणतीही अडचण नव्हती. पण ‘गदर’ इतका हिट चित्रपट होता, त्याचे कौतुकही झाले. पण तरीही मला काम मिळत नव्हते. हे घडले कारण, जग बदलत होते आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री बॉलिवूड बनत होती.”
हे देखील वाचा – Video : होम हवन, पूजा अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं स्वतःचं हक्काचं घर, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
“मी इंडस्ट्रीतील मोठे लोक किंवा कंपन्यांबरोबर काम करत नाही, कारण मी त्यांच्याशी संबंध ठेवू शकत नाहीत. मी ‘गदर’नंतर कोणतंही मोठे काम केले नाही किंवा कोणत्याही लोकप्रिय सिनेमाचा भागही नव्हतो.”, असं सनी देओल म्हणाला.
हे देखील वाचा – ‘गदर २’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, भयावह व्हिडीओ समोर
सनीने त्याच्या बॉलीवूड कारकिर्दीत गदर व्यतिरिक्त अनेक हिट चित्रपट दिली आहे. ‘गदर २’च्या निमित्ताने सनी देओल बऱ्याच काळानंतर बॉलीवूडमध्ये परतला असून त्याच्या भूमिकेला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. ‘गदर २’ बद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने आतापर्यंत ६०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे. चित्रपटात सनी देओलसह अमिषा पटेल, गौरव चोप्रा, मनीष वाधवा, सिमरत कौर, लव सिन्हा आणि उत्कर्ष शर्मा यांच्याही भूमिका आहेत. (Sunny Deol Gadar 2)