सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धर्मेंद्र अन् शबाना आझमींचा किसिंग सीन पाहिल्यावर लेक ईशा देओलने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “ते दोघेही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 29, 2023 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Esha Deol On Dharmendra

धर्मेंद्र अन् शबाना आझमींचा किसिंग सीन पाहिल्यावर लेक ईशा देओलने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, "ते दोघेही…"

अभिनेत्री ईशा देओल व वडील धर्मेंद्र यांचं उत्तम बॉण्डिंग आहे. त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. धर्मेंद्र हे कठोर वडील असल्याचे तिने उघड केले असले तरी, ते ईशा देओल व तिची बहीण अहाना देओलसाठी नेहमीच ‘हिरो’ आहेत. बरेचदा ईशाने तिचे वडील धर्मेंद्र यांचे कौतुक करत भाष्य केलं आहे. अशातच ईशाने तिचे वडील धर्मेंद्र यांच्या शबाना आझमीसोबतच्या किसिंग सीनबद्दलही भाष्य केले. (Esha Deol On Dharmendra)

‘रॉकी और रॉनी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. याबाबत आता धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल हिने भाष्य केलं आहे. ‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या एका मुलाखतीत ईशा देओलला धर्मेंद्रच्या किसिंग सीनबद्दल विचारण्यात आले. यावेळी बोलताना ती स्वतःच लाजली आणि म्हणाली की, “आम्हाला या सीनबद्दल कोणतीही माहिती नव्हती. आमच्यासाठी हे एक सरप्राइज होतं. ते दोघेही खूप प्रेमळ वाटत होते आणि ते दोघेही प्रोफेशनल कलाकार आहेत.”

हे देखील वाचा – “त्याचे कौतुक झाले पण”, ‘गदर’सारखा सुपरहिट चित्रपट देऊनसुद्धा सनी देओलला मिळत नव्हतं काम, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “मी ‘गदर’ नंतर…”

यापूर्वी हेमा मालिनी यांनीही चित्रपटांमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. तत्पूर्वी हेमा मालिनी यांना विचारण्यात आले की, धर्मेंद्रसारखे ऑनस्क्रीन किसिंग सीन करण्यासाठी ती ‘ठीक’ आहे का? याबाबत india.com शी बोलताना हेमा मालिनी यांनी खुलासा केला की, एखाद्या सीनसाठी खरंच आवश्यकता असेल तर नक्की करेन. हेमा मालिनी त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर देत म्हणाल्या,“का नाही, नक्कीच करेन. जर ते चांगले असेल आणि चित्रपटाशी संबंधित असेल तर कदाचित मी असं करु शकते.”

हे देखील वाचा – होम हवन, पूजा अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं स्वतःचं हक्काचं घर, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

धर्मेंद्र यांच्या सीनबद्दल प्रतिक्रिया देत हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, “धरमजी व शबाना आझमी यांचा किसिंग सीन मी अजुन पाहिलेला नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणं आवडतं,” असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.”

Tags: dharmendraentertainmenthema maliniisha deolrocky aur rani kii prem kahaani
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Madhurani Gokhale-Prabhulkar fan moment

Video : चाहतीने पाठवलेली भेटवस्तू पाहून 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी गोखले-प्रभुलकर झाली भावुक, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "इतक्या प्रेमाने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.