शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ती कधीच आई होऊ शकत नाही”, आदिल खानच्या आरोपांवर भडकली राखी सावंत, म्हणाली, “माझं गर्भाशय…”   

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 22, 2023 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rakhi sawant on pregnancy

“ती कधीच आई होऊ शकत नाही”, आदिल खानच्या आरोपांवर भडकली राखी सावंत, म्हणाली, “माझं गर्भाशय...”

ड्रामा क्वीन राखी सावंतचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. राखीने तिचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीवर काही महिन्यांपूर्वी गंभीर आरोप केले. त्यानंतर आदिलला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. आता तो तुरुंगातून बाहेर आला आहे. आदिलने राखीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राखीला धडा शिकवणार असल्याचंही तो म्हणाला. आदिलने पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक खुलासे केले. यावर आता राखीने प्रतिक्रिया दिली आहे.

राखी कधीच आई होऊ शकत नाही. तिच्या युट्रसचं ऑपरेशन झालं असल्याचं आदिलने सांगितलं. आता यावर राखीने उत्तर दिलं आहे. ती तिच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरलाच कॅमेऱ्यासमोर घेऊन आली आहे. डॉक्टरांबरोबरचा व्हिडीओ शेअर करत राखी म्हणाली, “देव प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही म्हणून त्यांनी डॉक्टरांना बनवलं आहे. काही महिन्यांपूर्वी माझं युट्रसचं ऑपरेशन झालं होतं. आदिलबरोबर लग्न केल्यानंतर मला मुल हवं होतं”.

आणखी वाचा – “माझे न्यूड व्हिडीओ काढले, ड्रग्ज दिलं अन्…”, पूर्वाश्रमीचा पती आदिलचे राखी सावंतवर गंभीर आरोप, म्हणाला, “कोट्यवधी रुपये तिने…”

“पण वेळेआधीच जर मी गरोदर राहिले असते तर युट्रसमध्ये फायब्रॉइडचे प्रमाण वाढलं असतं. ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं आज मी त्यांच्याजवळ आली आहे”. असं म्हणत राखी डॉक्टर वीना यांच्याकडे कॅमेरा फिरवते. दरम्यान वीना म्हणतात, “राखी आता आई बनू शकते. ती आता पूर्णपण ठिक आहे. मासिक पाळीही तिला नियमित येत आहे”. राखीने डॉक्टरांकडे जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा – “अशा कामाचा उपयोग काय?”, हेअरस्टायलिस्टने जेवण भरवणाऱ्यावरुन क्रांती रेडकरला नेटकऱ्यांनी सुनावलं, अभिनेत्री म्हणते, “कधीतरी…”

View this post on Instagram

A post shared by Waahiid Ali Khan (@sshaawntv)

पुढे राखी म्हणाली, “आदिल पूर्ण जगाला ओरडून सांगतो की, मी आई बनू शकत नाही. पण डॉक्टरांनी आता सत्य समोर आणलं आहे. आदिलला मला बदनाम करायचं आहे”. आदिल करत असलेले आरोप खोटे असल्याचं राखीचं म्हणणं आहे. आता राखी व आदिलचं हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचणार हे पाहावं लागेल.

Tags: Adil Khan Durranibollywood actressentertainmentrakhi sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Apurva Nemlekar Troll

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अपूर्वा नेमळेकर हिंदीमधील खलनायिका साकारणार, प्रोमो पाहताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "भूमिकेसाठी वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.