मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती सध्या ‘कलर्स मराठी वाहिनी’वरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात परिक्षकाची धुरा सांभाळत आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमी सोशल मीडियावर विविध व्हिडिओ, फोटो शेअर करताना दिसते. बऱ्याचदा ती चाहत्यांना तिच्या जुळ्या मुलींचे किस्से सांगताना दिसते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हिडिओची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.(Kranti Redkar Post a video with hairstylist)
क्रांती तिच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्यातील क्षणही सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला चाहत्यांकडून बरंच प्रेम मिळत असतं. बऱ्याच वेळा ती ट्रोलही होताना दिसते. सध्या तिने शेअर केलेली पोस्ट बरीच चर्चेत आहे. क्रांतीने तिच्या हेअर स्टायलिस्टचे कौतुक करण्यासाठी एक खास व्हिडिओ कॅप्शनसह शेअर केला आहे.
वाचा – क्रांतीच्या व्हिडिओवर नेटकरी काय म्हणाले? (Kranti Redkar Post a video with hairstylist)
या व्हिडिओत क्रांतीला तिची हेअर स्टायलिस्ट जेवण भरवताना दिसते. ती कॅप्शनमध्ये लिहीते की,“तुझ्यासाठी मोठा निबंध लिहिला तरी कमी पडेल…ही फक्त माझी हेअर स्टायलिस्ट नसून माझी खूप जवळची मैत्रीण आहे. माझ्या कठीण काळातही ती माझ्या कायमबरोबर होती. नीलू सदैव माझ्याबरोबर अशीच रहा” असं म्हणत तिने तिच्या हेअर स्टायलिस्टसाठी स्पेशल पोस्ट केली आहे.
तिच्या हेअर स्टायलिस्टनेही यावर कमेंट केली आहे. “थँक्यू मॅम मला आवडतं तुमच्यासाठी प्रेमाने सगळा काय करायला कारण तुम्ही सुद्धा तितकेच प्रेमळ आहात. माझी तेवढीच काळजी तुम्हालाही असते. आपण एकत्र किती छान दिवस व वाईटही दिवस बघितले. तुमचा इमोशनल सपोर्ट असो किंवा माझी समजूत घालणं असो. तुम्ही मला नेहमी मैत्रीण, बहिणीसारखं प्रेम आणि सपोर्ट केला आहे. अशीच तुमची साथ राहू द्या”, असं म्हणत तिने क्रांतीच्या पोस्टवर प्रेमळ कमेंट केली आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संमिश्र कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने “तुम्ही खूप लकी आहात. खूप कमी नाती आपल्याला अशी भेटतात. आपली जबाबदारी आहे की त्यांना जपून ठेवाव”, असं म्हणत या व्हिडिओचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, “स्वतःच्या हातून जेवायला पण वेळ नसेल तर काय उपयोग त्या कामाचा?Don’t be unkind till this mam”, असं म्हणत या पोस्टवरून क्रांतीला ट्रोल केलं आहे.त्यावर क्रांतीनेही, “कधीतरी मीही तिला जेवण भरवते. तुम्ही माणूसकीही समजून घ्या”, असं म्हणत त्याला उत्तर दिलं आहे.