रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी (RCB) मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. IPL च्या अंतिम सामन्यात आरसीबीने ६ धावांनी पंजाब किंग्ज टीमचा पराभव केला. आरसीबीने १९० धावा करत विरोधी टीमला चॅलेंज दिलं. मात्र पंजाब किंग्ज फक्त १८४ धावाच करु शकले. १८४ धावांमध्ये ७ विकेटमधून पंजाब किंग्जचा पराभव झाला. शेवटचे दोन ते तीन बॉलची मॅच असतानाच विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सामना आपल्या हातात आहे कळताच त्याने डोळ्यांमधूनच व्यक्त होण्यास सुरुवात केली. शेवटच्या बॉलमध्ये तर विराट रडू लागला. मैदानावर डोकं टेकवत त्याने सगळ्यांचे आभार मानले. डोळ्यांमध्ये आनंदाश्रूच्या धारा लागल्या होत्या. (Virat kohli anushka sharma viral video)
गेली १८ वर्ष सातत्याने तो आरसीबी टीमसाठी खेळत होता. मात्र प्रत्येकवेळी IPL ट्रॉफी घरी घेऊन जाण्याची संधी मात्र हुकली. मंगळवारी तो सोनोरी क्षण जेव्हा विराटच्या नशिबी आला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या त्याच्या संपूर्ण प्रवासात सातत्याने साथ देणारी व्यक्ती म्हणजे विराटची बायको अनुष्का शर्मा. सामना जिंकल्यानंतर आधी सहखेळाडूंना विराटने मिठी मारली, सेलिब्रेशन केलं.
आणखी वाचा – “१८ वर्षांची प्रतीक्षा संपली”, विराट कोहलीच्या RCB ला घवघवीत यश, कलाकरांकडून कौतुक, म्हणाले, “मेहनतीचं…”
हजारोंच्या गर्दीत विराट मात्र बायकोला विसरला नाही. गर्दीतून वाट काढत समोरुन अनुष्का येताना त्याला दिसली. तिला बघितल्यानंतर त्याचा आनंद काही औरच होता. दोघांनीही धावत येत एकमेकांना घट्ट मिठी मारली. सगळ्यात जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्यानंतर विराटला पुन्हा अश्रू अनावर झाले. एका मिठीत न बोलताच त्याने अनुष्काला विजयाची व्याखा काय आहे? हे सांगून टाकलं. विराट-अनुष्काचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. तसेच मिळून यश सेलिब्रेट करणाऱ्या या जोडप्याचा सगळ्यांना अभिमान आहे.
दरम्यान IPL ची ट्रॉफी अभिमानाने पटकावल्यानंतर विराटने त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आनंद व्यक्त करतानाही तो बायकोला मात्र विसरला नाही. अनुष्का बंगळुरची आहे म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर टीम IPL ची ट्रॉफी जिंकणं खूप महत्त्वाचं होतं असंही विराट म्हणाला. म्हणजेच आपल्या यशाचं श्रेय फक्त स्वतःकडे न घेता इतरांनाही ते देणं खरंच कौतुकास्पद आणि अभिमान वाटणारच आहे. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेलं यश नक्की कसं दिसतं? याची प्रचिती विराटकडे पाहूनच आली.