स्वतःचं मुल शाळेत जाणं, त्याने उत्तम शिक्षण घेणं म्हणजे प्रत्येक आई-वडिलांसाठी आनंदाची गोष्ट असते. आपल्या डोळ्यादेखत मुलाची होत असलेली प्रगती पाहून पालकांचा उर अभिमानाने भरुन येतो. असंच काहीसं आता अभिनेता शशांक केतकरबाबत झालं आहे. शशांकचा लेक आता शाळेत जातो. शालेय जीवनातलं त्याचं हे पहिलं वर्ष होतं. हे पहिलं वर्ष शशांकचा मुलगा ऋग्वेदसाठी महत्त्वाचं आणि आनंद देणारं होतं. शशांक व त्याची पत्नी प्रियांकानेही लेकाचं पहिलं शालेय वर्ष त्याच्यासह एन्जॉय केलं. याचाच एक व्हिडीओ शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. (shashank ketkar family)
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऋग्वेद त्याच्या टिचरसाठी आभारपत्र लिहित आहे. शशांक व प्रियांका त्याला पत्र लिहिण्यासाठी मदत करत आहे. लहान वयातच ऋग्वेदवर असणारे संस्कार खरंच कौतुकास्पद आहेत. अगदी लहान वयात पत्र लिहिण्याचा ऋग्वेदचा प्रयत्न त्याच्या पालकांनाही आनंद देणारा आहे.
आणखी वाचा – लग्नाच्या ७ वर्षांनंतर सागरिका घाटगे व झहीर खानने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्याचं आगमन, नाव ठेवलं…
शशांक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आमचं अभ्यासू पोरगं. आज ऋग्वेदच्या शालेय जीवनातलं पहिलं वर्ष संपलं. माँटेसरी झाली, आता तो ज्युनिअरमध्ये जाईल. किती मज्जा ना! गेलं वर्षभर त्याने शाळेत खूप मस्ती केली, हसला, रडला, धडपडला पण शिकला. आज शेवटच्या दिवशी त्याच्या शिक्षिका हर्षदा टिचर यांना त्याने हे स्वतःहून thank you letter लिहीलं. किती मज्जा ना!”.
आणखी वाचा – “नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो…”, कवितेमधून सलील कुलकर्णींनी ट्रोलर्सला सुनावलं, Video व्हायरल
पुढे तो म्हणाला, “मला सुद्धा त्याच्या शाळेला आणि शिक्षकांना Thank you म्हणायचं आहे. आणि त्याहीपेक्षा त्याच्या आईला, दोन्ही आजी आजोबांना thank you म्हणायचं. इतकी छान माणसं आयुष्यात असणं म्हणजे किती मज्जा ना!. आता काही लोक इथेही आम्हाला अक्कल शिकवतील की, पोरगं इतके छान प्रयत्न करतंय आणि तुम्ही त्याला K नीट लिहिता येत नाही म्हणून हसताय. किती वाईट पालक आहात? वगैरे वगैरे… त्यांच्यासाठी सांगतो याला खेळीमेळीचं वातावरण म्हणतात.
किती मज्जा ना!”. शशांकच्या या मुलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.