शुक्रवार, ऑगस्ट 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या ७ वर्षांनंतर सागरिका घाटगे व झहीर खानने दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्याचं आगमन, नाव ठेवलं…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 16, 2025 | 11:41 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sagarika ghatge and zaheer khan baby boy

लग्नाच्या सात वर्षांनंतर सागरिका घाटगे व झहीर खानने दिली गुडन्यूज, लेकाचं नाव ठेवलं...

सुप्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे व भारतीय क्रिकेटपटू झहीर खान हे चर्चेत असणारं कपल. सागरिका व झहीरने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. लग्नाच्या सात वर्षांनंतर सागरिका व झहीर आई-बाबा झाले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दोघांनीही मुलाबरोबरचा फोटो शेअर कर गुडन्यूज दिली. तसेच मुलगा झाला असल्याचं जाहिर केलं. इतकंच नव्हे तर मुलाचं नावंही त्यांनी ठेवलं आहे. त्याच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. (sagarika ghatge and zaheer khan baby boy)

सागरिका-जहीरच्या मुलाचा पहिला फोटो

सागरिका व झहीरने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत. “प्रेम, देवाच्या आशिर्वादाने आम्ही आमच्या गोड मुलाचं स्वागत करत आहोत” असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तसेच त्यांनी मुलाचं नावही जाहिर केलं. सागरिका व झहीरने ‘फतेहसिंह खान’ असं लेकाचं नाव ठेवलं आहे. हे नाव अगदी खास व युनिक आहे.

आणखी वाचा – ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान?, दुसरी पत्नी लवकरच देणार गुडन्यूज, Video व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Sagarika Z Ghatge (@sagarikaghatge)

लेकाचं नाव आहे फारच खास

सागरिका व झहीरने पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिडाक्षेत्रातील मंडळी तसेच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या गोड जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांकडूनही सागरिका व झहीरला आशिर्वाद दिले जात आहेत. काही महिन्यांपूर्वा सागरिका गरोदर असल्याचं समोर आलं होतं. मात्र दोघांनीही याबाबत बोलणं टाळलं होतं. आता थेट मुलगा झाला असल्याची बातमी देत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. सागरिका व झहीरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार आनंद काही औरच आहे.

आणखी वाचा – दिवंगत आईशी दोन-दोन तास गप्पा, कोंबडीबरोबर शूट अन्…; गोविंदाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचा दावा, नेमकं प्रकरण काय?

२०१७मध्ये सागरिका व झहीरचं थाटामाटात लग्न झालं. त्यांची लव्हस्टोरीही अगदी फिल्मी आहे. मित्रमंडळींमुळे सागरिका व झहीर एकमेकांना ओळखू लागले. मैत्री वाढल्यानंतर जवळपास दीड ते दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ‘चक दे इंडिया’ चित्रपट सागरिकासाठी महत्त्वाचा ठरला. काही काळ ती कलाक्षेत्रापासून दूर असली तरी तिचा कपड्यांचा ब्रँड आहे. त्यासाठी ती अधिकाधिक मेहनत करते. आता सागरिका व झहीरच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली आहे.

Tags: bollywood newsentertainment newsmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
 Kuku kohli death
Entertainment

ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन, दोन दिवसांपूर्वी आला हृदयविकाराचा झटका, बॉलिवूडला दिले हिट मुव्ही

ऑगस्ट 26, 2026 | 11:12 am
Next Post
Saleel Kulkarni song on trollers

“नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो...”, कवितेमधून सलील कुलकर्णींनी ट्रोलर्सला सुनावलं, Video व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.