‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. काही दिवसांतच चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकही अवाक् झाले. त्याने केलेलं काम, त्याची देहबोली तर कमालीची होती. चित्रपटातील संवाद, प्रत्येक सीन अगदी कौतुकास्पद. ‘छावा’ शेवटाकडे असताना तर सिनेरसिकांना अश्रू अनावर झाले. ‘छावा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असताना आता एक नवं प्रकरण डोकं वर करु पाहत आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या मराठी कलाकाराने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. फेसबुकद्वारे पोस्ट शेअर करत त्याने ‘छावा’ विषयी वेगळंच मत मांडलं. ‘छावा’ बाबात केलेली टीका पाहून आता प्रेक्षकही भडकले आहेत. (aastad kale on chhaava movie)
‘छावा’ चित्रपटावर टीका
‘छावा’ बाबात पोस्ट करणारा अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्तादने या चित्रपटात सूर्या ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाला दोन महिने उलटल्यानंतर त्याने ‘छावा’ वर टीका करत त्याचं मत मांडलं आहे. इतक्या महिन्यांनी त्याला ‘छावा’ का खटकला? ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला शिर्केंच्या वंशजांनी, काही राजकीय मंडळींनी ‘छावा’वर आक्षेप घेतला होता. मात्र चित्रपटात स्वतः काम करुनही आता आस्तादला जाग का आली? असाही प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बिग बींसमोरच ब्लाऊज काढण्यास सांगितलेलं अन्…; ‘तो’ धक्कादायक प्रकार पुन्हा समोर
आस्ताद काळे नक्की काय म्हणाला?
“मी आता खरं बोलणार आहे. ‘छावा’ वाईट चित्रपट आहे. चित्रपट म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी problematic आहे. सर्वतोपरी वाईट आहे”. असं आस्ताद म्हणाला. तो इथवरच थांबला नाही. त्याने पुढे म्हटलं की, “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं?. काय पुरावे आहेत याचे?”.
आणखी वाचा – “मला फरक पडत नाही”, गोविंदाबरोबर एकत्र राहण्यावरुन पत्नीचं भाष्य, कॅमेऱ्यासमोर असं काही बोलली की…
खरा इतिहास काय?
आस्ताद म्हणाला, “औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता तो या वेगाने चालू शकेल?. सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार कोणत्याही नदीकाठी. असं नाही व्हायचं हो. सोयराबाई राणी सरकार परपुरुषासमोर बसून पान लावतायत आणि ते खात आहेत? हे कसं चालतं?”. पोस्टच्या माध्यमातून आस्तादने असे अनेक प्रश्न विचारले आहेत. पण या वक्तव्यानंतर त्यालाच अधिकाधिक ट्रोल केलं जात आहे.