Kajol Reunites With On Screen Son : बॉलिवूड सिनेसृष्टीतील विशेष चर्चेत राहिलेला आणि लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’. या चित्रपटाच्या खास आठवणी आहेत. नव्वदीच्या काळात हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटातील शाहरुख खान व काजोलची जोडी विशेष चर्चेत राहिली. या चित्रपटातील शाहरुख खान व काजोलच्या मुलाची भूमिका साकारुन सर्वांची मने जिंकणाऱ्या जिब्रान खानने गुरुवारी संध्याकाळी मुंबईत ‘आझाद’ चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यावेळी त्याने काजोलचीही भेट घेतली आणि एक भावनिक क्षण शेअर केला. रेड कार्पेटवर कॅमेऱ्यांसाठी पोज देत असताना, जिब्रानने काजोलला तिच्या कारकडे चालताना पाहिले आणि तो तिच्याकडे धावण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि त्यांच्यात काही संभाषण झाले. ज्यामुळे त्यांचे चाहते खूश झाले. एका चाहत्याने लिहिले, “K3G आई-मुलाचे पुनर्मिलन”. तर दुसऱ्याने लिहिले, “मला तेच आठवले की, तो अजूनही तिला आई म्हणून हाक देतो”. काजोल पेस्टल ग्रीन कॉर्ड सेटमध्ये जबरदस्त आकर्षक दिसत होती, तर जिब्रानने ब्लॅक टी आणि निळ्या डेनिमसह जॅकेट घातले होते, जे प्रीमियरसाठी योग्य होते. दोघांच्या भेटीनंतर चाहते लगेचच उत्साहित झाले.
यावेळी त्यांचा संवाद फार कमी काळासाठी होता, पण त्यात कधी आनंद तर कधी दु:खाच्या आठ’कभी खुशी कभी गम’मधील काजोलचा लेक आता दिसतो असा, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्वणी चाहत्यांना भरुन आल्या. ‘इश्क विश्क रिबाउंड’ ट्रेलर इव्हेंटमध्ये, जिब्रानने काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाच्या भूमिकेबद्दल सांगितले होते आणि तो म्हणाला, “एवढ्या लहान वयात माझ्या मुलाच्या भूमिकेला इतके प्रेम मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. वर्षानुवर्षे मला मिळालेले प्रेम बिनशर्त आहे. आजही लोक मला तेच प्रेम देतात”. तो म्हणाला की, “त्याच्यावर कोणतेही दडपण नसले तरी चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाचा तो नेहमीच आदर करतो”.
आणखी वाचा – २४ तास उलटल्यानंतर कशी आहे सैफ अली खानची तब्येत? डॉक्टर म्हणाले, “रात्री उशिरा शुद्धीवर आला पण…”
दरम्यान, १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘आझाद’ चित्रपटातून रवीना टंडनची मुलगी रशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला आतापासूनच भरभरुन प्रेम मिळत आहे.