Ankita Lokhande Trolled : ‘लाफ्टर शेफ’ या टीव्ही शोचा दुसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. जसे की, अब्दू रोजिक, मन्नारा चोप्रा, एल्विश यादव, रुबिना दिलैक, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल. तर सुदेश लाहिरी, कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह आणि अंकिता लोखंडे हे अनेक जुने चेहरेही पाहायला मिळतं आहेत. या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये अंकिता पती विकी जैनबरोबर दिसणार की नाही, हे शो आल्यानंतरच कळणार आहे. दरम्यान, यापूर्वी अभिनेत्रीला या चित्रीकरणादरम्यान सेटवर स्पॉट करण्यात आले होते, जिथे ती गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. पण चुकून तिच्याकडून अशी चूक घडली जी अनेकांनी हेरली.
‘लाफ्टर शेफ सीझन २’ च्या सेटवर अंकिता लोखंडे गुलाबी रंगाच्या साडीत दिसली होती. यावेळी तिने सांगितले की, आज त्यांचे व्हॅलेंटाइन डे स्पेशल शूट आहे. म्हणूनच सर्व काही गुलाबी आहे. यानंतर तिने मकर संक्रांत ते पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. मग ती बोलताना अचानक थांबून म्हणाली, “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा”. पण मागून आवाज आला आणि अंकिताला स्वतःची चूक समजली. मग तिने पटकन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि नेटकऱ्यांनी हे हेरले होते आणि तिच्यावर खूप टीका केली.
एका यूजरने लिहिले की, “स्वातंत्र्य दिन नव्हे प्रजासत्ताक दिन”. दुसऱ्याने कमेंट केली, “तिला हे सुद्धा माहीत नाही की, प्रजासत्ताक दिन येणार आहे की स्वातंत्र्य दिन”. तर आणखी एका युजरने कमेंट केली, “ती किती अशिक्षित, मूर्ख आहे. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे, स्वातंत्र्यदिन नाही”. मात्र, अभिनेत्रीचे कौतुक करण्यातही तिचे चाहते मागे राहिलेले नाहीत.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची प्रकृती खालावली, रुग्णालयात बसून मेकअप करतानाचा फोटो, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
अंकिताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी अशी कमाई करण्यात अपयशी ठरला. याशिवाय ती तिचा पती विकीबरोबर ‘ला पिला दे’ म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली होती.