शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 13, 2025 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla tar mag fame actress Monika Dabde will become a mother soon and her baby shower ceremony done video viral

ठरलं तर मग फेम अभिनेत्री लवकरच आई होणार, नुकतंच पार पडलं डोहाळ जेवण

बाळाची चाहूल ही प्रत्येक आईच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना असते. आई होणं यापेक्षा अभूतपूर्व सुख कुठल्याही स्त्रीसाठी महत्त्वाचं नसतं.  गेल्या काही काळात बऱ्याच अभिनेत्रींनी गुडन्यूज शेअर केली होती. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मोनिका दबडे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे लवकरच आई होणार आहे. मोनिकाने ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना दिली होती. मोनिकाने पोस्टमध्ये तिचा व तिचा व छोटूशा शूजबरोबरचा फोटो शेअर करत आई होण्याच्या खुशखबरबद्दल सांगितलं होतं. (monika dabde baby shower)

सोशल मीडियावरील या खास पोस्टद्वारे तिने एप्रिल २०२५ मध्ये बाळाचं स्वागत करणार असल्याचं होतं. त्यामुळे मोनिका आता खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असून नुकतंच तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे. मोनिकाने डोहाळे जेवणासाठी खास तयारी केली होती. सुंदर अशी साडी, त्यावर फुलांचे दागिने, नाकात नथ, साडीवर ‘आई’ असं नाव लिहिलेला बॅच असा सुंदर लूक अभिनेत्रीने डोहाळे जेवणासाठी केला होता. तिच्या या खास लूकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोनिकाने तिचा मेकअप केलेल्या मेकअप आर्टिस्टचे कौतुक करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai Khole (@saai_makeup_artist)

आणखी वाचा – “एजे तिळासारखे कडू आणि…”, लीलाचा एजेंसाठी हटके उखाणा, म्हणाली, “आमच्या लुडबूड करणाऱ्यांची…”

तसंच पुढे व्हिडीओमध्ये ती असं म्हणते की, “‘ठरलं तर मग’ या मालिकेत मी मोनिका साकारताना एका वेगळ्या रुपात असते. तशाच एका वेगळ्या रुपात मी आता आहे. मला सातवा महिना लागला असून माझं डोहाळे जेवण पार पडणार आहे”. मोनिका मालिकांमध्ये काम करण्याबरोबरच तिच्या युट्युबवरील व्लॉगसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. मोनिका त्याच्या डेली व्लॉगमध्ये रोज वेगवेगळ्या रेसिपी शेअर करत असते. तिने स्वतःला १००० रेसिपी बनवण्याचे चॅलेंज दिले आहे.

आणखी वाचा – ‘बाहुबली’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याकडून हॉटेलची तोडफोड अन् नुकसान, परिवारातील अन्य सदस्यांवरही गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, मोनिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. युट्यूबवरील रेसिपीचे अनेक व्हिडीओही ती सोशल मीडियावर शेअर करते. अशातच आता अभिनेत्री डोहाळेजेवणाचे फोटो केव्हा शेअर करणार? यासह ती बाळाला जन्म कधी देणार? याचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: monika dabde baby showerthalara tar mag fame monika dabadeTharala tar mag
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
masaba gupta reveals baby girl name

मसाबा गुप्ताने प्रेग्नंसीच्या तीन महिन्यांनी केलं लेकीचं बारसं, नीना गुप्तांच्या नातीचं नाव फारच युनिक, अर्थ आहे…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.