69th National Film Awards Ceremony Updates in Marathi मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाचा सन्मान मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्टला करण्यात आली होती. आज म्हणजेच १७ ऑक्टोबरला या पुरस्कारांचा प्रदान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचं आयोजन मंगळवारी विज्ञान भवन दिल्ली येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लु अर्जुनला पुष्पा: द राइज चित्रपटासाठी देण्यात आला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्ट व अभिनत्री क्रीती सेनन यांना अनुक्रमे गंगुबाई काठियावाडी व मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार स्विकारला. (69th National Film Awards Ceremony)
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : रॉकेटी हिंदी
उत्तम मनोरंजन देणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: आरआरआर तेलुगु
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: गोदावरी मराठी
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगुबाई : काठियावाडी) व क्रिती सेनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी (मिमी) हिंदी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स) हिंदी
दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार : मेप्पडियन (मल्लाळम)
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार : द काश्मीर फाइल्स (हिंदी)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : गांधी अँड कंपनी (गुजराती)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : भाविन रबारी, (छेलो शो) गुजराती
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन : (गाणी) पुष्पा : द राइज
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पार्श्वभूमी स्कोअर : एमएम कीरावानी (आरआरआर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : काला भैरव (आरआरआर) मधील कोमुराम भीमुडो तेलुगु
सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका : इरावीन निझाल
सर्वोत्कृष्ट गीत : कोंडा पोलम (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन :सरदार उधम (हिंदी)
सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी : चविट्टू (मल्याळम)
झिल्ली (बंगाली) व सरदार उधम (हिंदी)
सर्वोत्कृष्ट छायांकन : सरदार उधम (हिंदी)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सरदार उधम (हिंदी)
सर्वोत्कृष्ट संपादन : गंगुबाई काठियावाडी (हिंदी)
सर्वोत्कृष्ट मेकअप :गंगुबाई काठियावाडी (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पटकथा :नायट्टू (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक रुपांतरित : गंगूबाई काठियावाडी (हिंदी)
सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन : आरआरआर
विशेष ज्युरी पुरस्कार : शेरशाह
सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट : बूमबा राइड
हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट : सरदार उधम
कन्नडमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म :७७७चार्ली
मल्याळममधील सर्वोत्कृष्ट फीटर फिल्म : होम
मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट: एकदा काय झालं?
ओडिसातील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : प्रतीक्षा द वेट
तामिळमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : काडैसी विवसयी द लास्ट फार्मर
तेलुगूमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : उपेना वेव्ह
#WATCH | Allu Arjun receives the Best Actor Award for 'Pushpa: The Rise', at the National Film Awards. pic.twitter.com/FemqdiV41y
— ANI (@ANI) October 17, 2023
यावेळी रेड कार्पेटवर बऱ्याच कालारांनी आपली मतं व्यक्त केली. “माझा अभिनयसृष्टीतील प्रवास ९ वर्षांचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. इतक्या गंभीर भूमिका लवकर मिळत नाही. पण दिग्दर्शक व निर्मात्यांनी मला ही संधी दिली, त्यासाठी त्यांचे आभार. एका दशकाच्या करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही मोठी गोष्ट आहे,” असं क्रिती सेनॉन म्हणाली.
#WATCH | Alia Bhatt receives the Best Actress Award for 'Gangubai Kathiawadi', at the National Film Awards. pic.twitter.com/dwiXrBGlND
— ANI (@ANI) October 17, 2023
“मी चित्रपटनिर्माता असून प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो. त्यामुळे कोणताही पुरस्कार माझ्यासाठी बोनस असतो. मला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. आम्हाला सहा पुरस्कार मिळाले आहेत,” असं ‘आरआरआर’ निर्माते राजामौली म्हणाले.
#WATCH | Kriti Sanon receives the Best Actress Award for her film 'Mimi', at National Film Awards. pic.twitter.com/TBVlOkITOC
— ANI (@ANI) October 17, 2023
“भारत बहुभाषिक देश आहे. कोणतीही एक भाषा नाही, तर सर्व भाषा महत्त्वाच्या आहेत याची जगही दखल घेत आहे. हा चित्रपट गोदावरी नदीवर आधारित आहे आणि गोदावरी काठी राहणाऱ्या कुटुंबावर आधारित आहे. हा चित्रपट दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्यासाठी मी बनवला होता,” असं ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाला.
#WATCH | Singer Shreya Ghoshal receives the Best Female Playback Singer award for the song 'Mayava Chayava' from the film 'Iravin Nizhal', at the National Film Awards. pic.twitter.com/TAMQ5H0mty
— ANI (@ANI) October 17, 2023
“मी खूप आनंदी आहे. माझा अभिनयसृष्टीतील आतापर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता. इतक्या वर्षांनी मला हा सन्मान मिळतोय, त्यासाठी मी आभारी आहे,” असं दादासाहेब फाळके पुरस्काराच्या विजेत्या दिग्गज अभिनेत्री वहीदा रेहमान म्हणाल्या. पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा भावनिक झाल्या होत्या.
#WATCH | Delhi | Choreographer Prem Rakshit receives the Best Choreography award for 'RRR' at the National Film Awards. pic.twitter.com/52Z7AcGZF3
— ANI (@ANI) October 17, 2023
राष्ट्रीय पुरस्कार सोहळा दुपारी वाजता सुरु झाला. हा पुरस्कार चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांन भारत सरकारकडून दरवर्षी दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. यावेळी पहिला पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होती.