शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सायली-अर्जुनमध्ये नवं कॉन्ट्रॅक्ट?, प्रपोजही करणार, बहरणार प्रेमाचं नातं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 20, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag Serial Update

सायली-अर्जुनमध्ये नवं कॉन्ट्रॅक्ट?, प्रपोजही करणार, बहरणार प्रेमाचं नातं अन्…; मालिकेत मोठा ट्विस्ट

‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अर्जुन-सायलीच्या बहरलेल्या नात्याला कोणाची तरी नजर लागली असल्याचं चित्र दिसत आहेत. अर्जुन-सायलीमध्ये बहरत जाणाऱ्या प्रेमाला पूर्णविराम मिळत आता त्यांच्यात दुरावा येणार असल्याचा सिक्वेन्स सुरु आहे. मालिकेत अर्जुन-सायलीच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असून त्यांच्यातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही काही वेळात संपणार असल्याचं समोर आलं आहे. कॉन्ट्रॅक्ट मरेज संपताच सायली व अर्जुन एकमेकांपासून दूर होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Tharal Tar Mag Serial Update)

लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून दोघांनी वेगळं व्हायचं आणि त्यानंतर रितसर दोघांचाही कोर्टात घटस्फोट होईल असं अर्जुन-सायलीने आधीच ठरवलेलं असतं. परंतु वर्षभरात त्यांच्यात चांगली मैत्री होते आणि नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून एकमेकांपासून दूर जाणं दोघांनाही कठीण होऊन बसलं आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असून अद्याप त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली नाही.

आणखी वाचा – सूर्यकांत कदमला धडा शिकवत श्रीकांतची सुखरुप सुटका, आदित्य पडला प्रेमात, अहिल्यादेवी लग्नास परवानगी देणार का?

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तर एकीकडे अर्जुन व सायलीला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच सरप्राइज देण्याचं सुभेदार कुटुंबीय ठरवितात.दोघांसाठी ते सरप्राइज प्लॅन करतात. यावेळी सायलीच्या मनात या सगळ्या लोकांची फसवणूक केल्यामुळे दडपण निर्माण होतं. तर, अर्जुन “मिसेस सायलींना माझ्यापासून कधीच वेगळं करू नकोस देवा” अशी इच्छा मागतो. अखेर अर्जुनची इच्छा आता पूर्ण होणार असून मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे.

आणखी वाचा – “जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस”, ट्रोल करणाऱ्यावर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “स्वतःची लायकी…”

मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, अर्जुन सायलीला म्हणतो, “बायको मला तुला प्रपोज करायचंय…म्हणजेच मला माझी एक आयडिया तुझ्यासमोर प्रपोज करायची आहे. आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं असलं तरीही केस जिंकेपर्यंत तुम्ही इथेच राहावं असं मला वाटतं”, यावर सायली “हो सर हे मला मान्य आहे”, असं उत्तर त्याला देते. सायलीने सुभेदारांकडे राहायला होकार दिल्यामुळे अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर मनोमनी आपणही इथेच राहणार म्हणून सायलीही खुश असते.

Tags: entertainmentmarathi serialtharal tar magTharal Tar Mag Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Appi Amachi Collector Promo

अप्पी सिंबाला सांगणार त्याच्या बाबांची गोष्ट, अमोलच्या वाढदिवसाला तरी होणार का त्याची बाबांबरोबर भेट?, नवा प्रोमो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.