सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

69th National Film Awards Ceremony : लग्नातली साडी नेसून आलिया भट्टने स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार, रणबीर कपूरसह सोहळ्याला हजेरी, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2023 | 5:02 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
69th National Film Awards Ceremony

लग्नातली साडी नेसून आलिया भट्टने स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार, रणबीर कपूरसह सोहळ्याला हजेरी, व्हिडीओ व्हायरल

69th National Film Awards Ceremony Updates in Marathi : यंदाच्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आता या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या सादरीकरणाचा समारंभ आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी अनेक चित्रपट दिग्गज उपस्थित आहेत.

यंदाच्या ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक नामांकने जाहीर करण्यात आली होती. दरम्यान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील गंगुबाई हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट हिला पुरस्कार मिळाला असल्याची घोषणा झाली. त्यावेळी आलियावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. चित्रपट, साहित्य व कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले आहेत.

आणखी वाचा – आलिया भट्ट झोपली, रणबीर कपूरचं मोबाईलवर लक्ष अन्…; नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान ‘त्या’ कृतीमुळे बॉलिवूड कलाकार ट्रोल, फोटो व्हायरल

दरम्यान, या पुरस्कार सोहळयाला अभिनेत्री आलिया भट्ट हिने पती रणवीर कपूरसह हजेरी लावली. आलियाला नुकताच ६९व्या राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आलियाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. या भव्य पुरस्कारासाठी आलियाने तिच्या लग्नाच्या साडीची निवड केली आहे. थेट लग्नातली साडी नेसून आलिया भट्टने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारही करत आहेत कौतुक

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील गंगुबाई या भूमिकेसाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर आलियासह ‘मिमी’ या चित्रपटाकरिता अभिनेत्री क्रिती सॅनॉन हिला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन याला देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याला अल्लू अर्जुनने पत्नीसह हजेरी लावली होती.

Tags: 69th National Film Awards Ceremonyalia bhattbest actressentertainmentgangubai kathiawadi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Presentation Ceremony of 69th National Film Awards Updates in Marathi

69th National Film Awards Ceremony : आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, मराठी चित्रपटांनीही मिळवलं स्थान, कलाकारांचं होतंय कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.