शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अरुण कदम यांना गरबा खेळण्याचा मोह आवरेना, मंचावरच मराठी अभिनेत्रीसह केला धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 17, 2023 | 6:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Arun Kadam and Yogita Chavan dance in Navratrotsav

Video : अरुण कदम यांना गरबा खेळण्याचा मोह आवरेना, मंचावरच मराठी अभिनेत्रीसह केला धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. यामधील काही कलाकार हे विनोदी व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध असतात. तर काही कलाकारांनी संवेदनशील व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. छोट्या पडद्यावरील असे दोन कलाकार आहे, जे सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे, ते म्हणजे अरुण कदम आणि योगिता चव्हाण. (Arun Kadam and Yogita Chavan dance in Navratrotsav)

अभिनेते अरुण कदम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तर अभिनेत्री योगिता चव्हाण ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत दिसली होती. जरी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी तिची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोविंग आहे. असाच या जोडीचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

हे देखील वाचा – “मराठी चित्रपटांचं मार्केटिंग…”, ‘आत्मपॅम्प्लेट’ला प्रतिसाद न मिळाल्याने दिग्दर्शकाची पोस्ट, म्हणाला, “चित्रपट बघावा असं…”

सध्या देशभरात नवरात्रौत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. नवरात्री निमित्त ठिकठिकाणी गरबा दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबईतील एका गरबा कार्यक्रमाला अरुण कदम आणि योगिता चव्हाण यांनी नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह पाहून अरुण कदम यांना डान्स करण्याचा मोह आवरला नाही. व त्यांनी एका गाण्यावर हटके डान्स सादर केला. यावेळी योगिताही त्यांना साथ देताना दिसली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, तो व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतो.

हे देखील वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारही करत आहेत कौतुक

अभिनेते अरुण कदम यांनी हास्यजत्रेसह अनेक विनोदी कार्यक्रम व चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम व्यक्तिरेखसा साकारत प्रेक्षकांची भरभरून मनोरंजन केले आहे. तर, योगितानेही ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत अंतरा ही भूमिका साकारली होती, ज्याचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. ती सध्या कोणत्या मालिकेत दिसली नाही. मात्र, सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Tags: arun kadamArun Kadam and Yogita Chavan dance in Navratrotsavnavratrotsav 2023yogita chavan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Madhugandha Kulkarni Replied to onlooker

“मराठी चित्रपटांची हवा पुण्याच्या बाहेर का नाही?”, नेटकऱ्यांनी मराठी अभिनेत्रीला सुनावलं, उत्तर देत म्हणाली, “खूप त्रास होतो पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.