बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. अभिनेता सध्या त्याच्या वैक्तिक आयुष्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या तो त्याच्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसत आहे. गेल्या महिन्यात अभिनेत्याची पत्नी शीतल ठाकूर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दोघांनी त्यांच्या बाळाचे नाव वरदान असे ठेवले आहे. दोघांनीही आपल्या मुलाच्या जन्माचा आनंद सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसह शेअर केला. आता विक्रांतने आपल्या मुलाच्या नावाचा टॅटू बनवला आहे, जो पाहून चाहते त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत. (Vikrant Massey)
विक्रांत मॅसीने आपल्या हाताचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने त्याच्या हातावर ‘वरदान’ असे नाव कोरले आहे. याबरोबर आणखी एक खास गोष्ट म्हणजे टॅटू. त्याने आपल्या मुलाची जन्मतारीख ७ फेब्रुवारी २०२४ देखील गोंदवून घेतली आहे. इंस्टाग्रामवर टॅटूचा फोटो शेअर करत ३६ वर्षीय विक्रांतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ॲडिशन किंवा ॲडिक्शन, मला दोन्ही आवडतात”. याबरोबर त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

विक्रांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, विक्रांतने २०१५ मध्ये अभिनेत्री शीतल ठाकूरला डेट करायला सुरुवात केली होती. २०१८ मध्ये ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. काही रिपोर्ट्सनुसार या शोच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली.
विक्रांत व शीतल यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये लग्न केले आणि १४ फेब्रुवारी २०२२ रोजी नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला. चार दिवसांनंतर १८ फेब्रुवारीला दोघांनी हिमाचल प्रदेशात साधेपणाने लग्न केले. अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, विक्रांत आता ‘यार जिगरी’, ‘सेक्टर 36’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’, ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’मध्ये झळकणार आहे.