शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकासाठी कायपण! वडील झाल्यानंतर विक्रांत मेस्सीने मुलासाठी केली ही खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 31, 2024 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vikrant Massey

लेकासाठी कायपण! वडील झाल्यानंतर विक्रांत मेस्सीने मुलासाठी केली ही खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. अभिनेता सध्या त्याच्या वैक्तिक आयुष्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या तो त्याच्या कुटुंबासह वेळ घालवताना दिसत आहे. गेल्या महिन्यात अभिनेत्याची पत्नी शीतल ठाकूर हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दोघांनी त्यांच्या बाळाचे नाव वरदान असे ठेवले आहे. दोघांनीही आपल्या मुलाच्या जन्माचा आनंद सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसह शेअर केला. आता विक्रांतने आपल्या मुलाच्या नावाचा टॅटू बनवला आहे, जो पाहून चाहते त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत. (Vikrant Massey)

विक्रांत मॅसीने आपल्या हाताचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने त्याच्या हातावर ‘वरदान’ असे नाव कोरले आहे. याबरोबर आणखी एक खास गोष्ट म्हणजे टॅटू. त्याने आपल्या मुलाची जन्मतारीख ७ फेब्रुवारी २०२४ देखील गोंदवून घेतली आहे. इंस्टाग्रामवर टॅटूचा फोटो शेअर करत ३६ वर्षीय विक्रांतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ॲडिशन किंवा ॲडिक्शन, मला दोन्ही आवडतात”. याबरोबर त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

आणखी वाचा – “दोन्ही मुलांना माझ्या पायावर…”, विजय गोखलेंनी सांगितला चाहत्याचा खास किस्सा, म्हणाले, “रात्री साडेतीन वाजता आले अन्…”

विक्रांतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, विक्रांतने २०१५ मध्ये अभिनेत्री शीतल ठाकूरला डेट करायला सुरुवात केली होती. २०१८ मध्ये ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले. काही रिपोर्ट्सनुसार या शोच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली.

आणखी वाचा – “चरस, गांजाचं व्यसन…”, भर कॉन्सर्टमध्ये हनी सिंगने चाहत्यांना दिला मादक पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला, म्हणाला, “आयुष्य उद्ध्वस्त…”

विक्रांत व शीतल यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये लग्न केले आणि १४ फेब्रुवारी २०२२ रोजी नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला. चार दिवसांनंतर १८ फेब्रुवारीला दोघांनी हिमाचल प्रदेशात साधेपणाने लग्न केले. अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, विक्रांत आता ‘यार जिगरी’, ‘सेक्टर 36’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’, ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’मध्ये झळकणार आहे.

Tags: bollywood actorentertainmentvikrant masseyVikrant Massey tattoo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Atul Parchure Shared Funny Incident

झुरळांना घाबरणाऱ्या अतुल परचुरेंची नाटकादरम्यान अशी उडाली तारांबळ, मजेशीर किस्सा सांगत म्हणाले, "माझ्या दिशेने यायला लागली अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.