मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दोन्ही मुलांना माझ्या पायावर…”, विजय गोखलेंनी सांगितला चाहत्याचा खास किस्सा, म्हणाले, “रात्री साडेतीन वाजता आले अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 31, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vijay Gokhale Incident

"दोन्ही मुलांना माझ्या पायावर...", विजय गोखलेंनी सांगितला चाहत्याचा खास किस्सा, म्हणाले, "रात्री साडेतीन वाजता आले अन्…”

मराठी सिनेसृष्टीत नाटक, चित्रपट, मालिका यांसारख्या तीनही माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते म्हणजे विजय गोखले. विजय गोखले यांनी आजवर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. रंगमंचावरुन विजय यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तसेच मालिकाविश्वातूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या विजय यांनी नुकतीच ‘झी नाट्य गौरव’मध्ये ‘नाटक किस्से व आठवणी’ या सेगमेंटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना विजय यांनी नाटकादरम्यानचा एक उत्तम अनुभव चाहत्यांसह शेअर केला. (Vijay Gokhale Incident)

विजय गोखले व निवेदिता सराफ अभिनीत ‘वाहतो दुर्वांची जोडी’ या नाटकाला भरभरून प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. ‘वाहतो दुर्वांची जोडी’ या नाटकादरम्यानचा एक अनुभव विजय यांनी चाहत्यांसह शेअर केला. विजय गोखले म्हणाले, “या नाटकात बिगडलेल्या दोन मुलांची कथा दखवण्यात आली. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि अक्षरशः हजारो लोकांनी हे नाटकाचे प्रयोग पाहिले. कोकणात तरळा नावाचं गाव आहे. तिथे हा मी प्रयोग केला”.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीच भाचींबरोबर आहे खास बॉण्डिंग, भेटायला थेट सेटवर आल्या अन्…; व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “नुसता उच्छाद…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुढे म्हणाले , “ज्येष्ठ अभिनेते बाळ कोल्हटकर व अभिनेत्री आशाताई काळे हे दोन दिग्गज भूमिका करायचे त्यांच्यानंतर मी आणि निवेदिता सराफ या भूमिका केल्या. त्या दिवशी हा प्रयोग संपवून मी लॉजवर कणकवलीला गेलो. रात्रीच्या साडेतीन वाजता चव्हाण नावाचे गृहस्थ दोन मुलांना घेऊन आले. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना माझ्या पायावर घातलं. त्यांनी सांगितलं माझी दोन्ही मुलं बिघडलेली, वाईट मार्गाला लागलेली मुलं आहेत”.

आणखी वाचा – “हिचं ऍक्सिडंट का होत नाही”, निगेटिव्ह प्रतिक्रियांबाबत ऐश्वर्या नारकरांचं भाष्य चर्चेत, म्हणाल्या, “प्रेक्षकांच्या डोक्यात…”

यापुढे ते असंही म्हणाले की, “आजचा अभिनय, आजची ताकद, आजच नाटक पाहून आयुष्यभर आम्ही चांगले वागू असं देवासमोर उभं राहून वचन घेतलं, आणि असं वचन मला त्यांनी दिलं आहे. त्यावेळी मला एक गोष्ट कळली की, कला व समाज यांचा एकमेकांवर होणार परिणाम पाहायला मिळाला”.

Tags: entertainmentmarathi actorvijay gokhalevijay gokhale incident
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Prasad Khandekar On Wife

Video : "जेव्हा बायकोची बाईक अचानक आपल्या गाडीसमोर येते तेव्हा…", प्रसाद खांडेकरने शेअर केला तो व्हिडीओ, म्हणाला, "हॉर्न ओके…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.