हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने काही काळापूर्वी सिनेसृष्टीत कमबॅक केलं आहे. सिने इंडस्ट्रीत आपली जुनी ओळख परत मिळवण्यासाठी तो दिवसरात्र मेहनत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मधल्या काही काळात म्हणजेच अनेक वर्षांपासून हनी सिंग इंडस्ट्रीतून गायब होता, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ड्रग्जच्या व्यसनामुळे या रॅपरने त्याचं करिअर संपवलं असल्याच्या चर्चा होत्या. अशातच आता हनी सिंगच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना मादक पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला देत आहे. (Honey Singh Statement)
हनी सिंगचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये रॅपर असं बोलताना दिसत आहे की, “बंधू आणि बहिणींनो. तुम्ही सर्व माझे लहान भाऊ आणि बहिणी आहात. हा गांजा ओढू नकोस भाऊ. माझ्या आयुष्यातील पाच वर्षे वाया गेली. दारू प्या, पाहिजे तेवढी प्या. फक्त चरस आणि गांजाचे व्यसन करु नका. चला आनंदासाठी गाणे वाजवूया. हर हर महादेव”.
या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, :पाजी नेहमी पुढच्या स्तरावर असतात”. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘संगीताचे जनक’ अशी उपमा त्याला दिली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, “भाईंनी हे गांजा पिऊन म्हटलं आहे”.
शहनाज गिलच्या शोमध्ये हनी सिंगने त्याच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दल उघडपणे बोलले भाष्य केले होते. रॅपरने सांगितले होते की, त्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि अल्कोहोल घेण्यास सुरुवात केली होती. हनी सिंग म्हणाला होता की, “काही वेळानंतर मला समजले की मी मनोविकाराची लक्षणे आणि द्विध्रुवीय विकाराने ग्रस्त आहे. हे कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत घडते जेव्हा तो अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचतो. मग त्यावर उपचार केले गेले आणि मला बरे व्हायला ६ ते ७ वर्षे लागली. आता मी या आजारातून पूर्णपणे बरा झालो आहे”.