12 December Horoscope : १२ डिसेंबर २०२४, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस असणार आहे. ग्रहांच्या चालीनुसार मार्गशीर्ष महिन्याचा दूसरा गुरुवार कर्क राशीच्या लोकांसाठी निराशेचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला निराशेचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरातील वातावरण भक्तिमय राहील. जाणून घ्या गुरुवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार आहे आणि तुमच्या नशिबात नक्की काय असणार आहे? (12 December Horoscope)
मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायातील मंदीमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. शैक्षणिक क्षेत्रातील विविध परीक्षांची तयारी सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. मित्राशी मतभेद होऊ शकतात. कुटुंबात सुख-शांती नांदेल.
वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या भवितव्याबद्दल तुम्ही खूप चिंतेत असाल. तुमचे मन प्रसन्न असेल.
मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी यश येताना दिसते. नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते, त्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या लोकांना गुरुवारच्या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी निराशेचा सामना करावा लागू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामात यश मिळेल.
सिंह (Leo) : सिंह राशीचे लोक व्यवसायाबद्दल चिंतेत असाल. जर तुम्ही तुमच्या नोकरीच्या क्षेत्रात बदल करण्याचा विचार करत असाल तर कोणताही बदल करू नका, कुटुंबात सुख-शांती राहील, मुलांच्या शिक्षणाची चिंता असेल. जर तुम्ही धार्मिक यात्रा करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली कल्पना आहे.
कन्या (Virgo) : कन्या राशीच्या लोकांना सरकारी नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरी धार्मिक कार्यकम आयोजित करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल. यामुळे मन आनंदी राहील.
तूळ (Libra) : तूळ राशीच्या लोकांना आपल्या कुटुंबाची चिंता सतावू शकते. नोकरीतील लोकांना काही प्रमाणात चांगले यश मिळेल. शिक्षणाशी संबंधित लोकांना खूप मेहनत करावी लागेल, त्यांना निश्चितच फळ मिळेल. कुटुंबातही काही कारणावरुन मतभेद होतील.
वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीचे लोक कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकतात. घरातील वातावरण भक्तिमय राहील. तुम्ही एखाद्या मित्राला भेटू शकता, परंतु या भेटीमुळे भविष्यात तुमचे नुकसान होईल. आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा
धनु (Sagittarius) : राजकारणात नशीब आजमावणाऱ्या धनु राशीच्या लोकांना सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळू शकतो. व्यवसाय करणारे लोक फायद्याची अपेक्षा करतील, पण फायदा होणार नाही. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी वाद होऊ शकतात. हा वाद तुमच्यासाठी हानिकारक ठरेल.
मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस चांगला जाईल. सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. कोर्टात तुमची काही केस असेल तर ती लवकरात लवकर निकाली काढा, अन्यथा निर्णय तुमच्या विरोधात जाऊ शकतो. कौटुंबिक जीवन पूर्णपणे आनंदी होईल.
आणखी वाचा – विक्रांत मेस्सीचा बहुचर्चित ‘द साबरमती रिपोर्ट’ आता ओटीटीवर येणार, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीचे लोक प्रवासात दिवस घालवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. कोणत्याही प्रकारचे वाहन किंवा घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नका.
मीन (Pisces) : मीन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस कामाच्या ठिकाणी फायदेशीर राहील. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामात यश मिळेल. काही काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा राहील.