Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. मालिकेत अनुष्काने तिचे डाव टाकायला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. इकडे अहिल्यादेवी अनुष्का व आदित्यची पत्रिका पाहण्याचा कार्यक्रम करतात. ही गोष्ट अनुष्काला कळते तेव्हा तिला राहवत नाही. आता काही करुन गुरुजींना किर्लोस्कर कुटुंबात जाण्यापासून थांबवायला हवं असा ती निर्धार करते आणि तिच्या मामीला फोन करुन चौकशी करते. तेव्हा तिची मामी सांगते की, मला अहिल्यादेवींनी किर्लोस्कर मेन्शनमध्ये पत्रिका घेऊन बोलावलं आहे. हे ऐकल्यावर अनुष्का गोंधळते. इकडे पारू आदित्य व अनुष्काला वाटेत मिळणाऱ्या एका मंदिरात घेऊन येते आणि सांगते की, अहिल्यादेवी इथे येऊन नेहमीच अभिषेक करायच्या.
अनुष्काला ही गोष्ट कळते तेव्हा अनुष्का सुद्धा आदित्यसाठी अभिषेक करायचं ठरवते आणि पारू अनुष्का व आदित्यला सांगते की, या कळशी मध्ये तुम्ही मंदिराच्या शेजारी असलेल्या हापश्यातून पाणी काढा आणि त्याचा अभिषेक करा. हे ऐकल्यावर दोघंही हापश्या जवळ जातात तर पारू तिथे बसून गंमत पाहत असते. आता पारूला माहित असतं की, वर्षानुवर्ष एकही थेंब पाणी या हापशीतून पाणी आलेलं नाहीये त्यामुळे ती आदित्यची गंमत पाहत असते. मी नोकर आहे ना असं तुम्ही म्हणालात ना आता तुम्ही बघा तुमचं काय होतं असं म्हणत ती मनातल्या मनात गंमत पाहत बसते.
आणखी वाचा – शेवटी बजरंगने पलटी मारलीच, भुवनेश्वरीचा खरा चेहरा समोर आणण्याची अक्षराची धडपड यशस्वी होणार का?
आदित्य हापशी देत देत दमून जातो मात्र पाणी काही येत नाही त्या वेळेला तिथे असणारा एक माणूस पुढे येतो तितक्यात पारू मागून जाऊन कळशीतील थोडंसं पाणी ओतते आणि कळशीला पाणी आलं आहे ते पाहून अनुष्का ती कळशी उचलून अभिषेक करायला जाते. त्यावेळेला पारू तिच्या मागून जाते. तेव्हा तो माणूस आदित्यजवळ येतो आणि म्हणतो की, या हापशीला एक थेंबही किती वर्ष झालं पाणी आलेलं नाहीये त्यामुळे तुमच्या बायकोने चांगलंच तुम्हाला कामाला लावलं आणि तुमची खोड मोडली आहे आणि तिनेच तुम्हाला फसवलं आहे. बायकांच मन जपत जा, असा सल्ला तो आदित्यला देतो.
आणखी वाचा – शत्रुघ्न सिन्हा पत्नीची करत होते फसवणूक, लग्न होऊनही अनेक मुलींशी होते संबंध, म्हणाले, “मला पश्चाताप…”
तर इकडे अनुष्काला एक माणूस भेटायला आलेला असतो ज्याला अनुष्का आदित्य वर हल्ला करायचं सांगते आणि तिच्या स्वतःवरही हल्ला करण्यास सांगते जेणेकरुन अहिल्यादेवींना संशय येणार नाही. आता अनुष्काची पारू खोड मोडून काढणार का हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.