शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सातव्या मुलीची…’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, शूटचा शेवटचा दिवस, सेटवरील व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 11, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Satvya Mulichi Satavi Mulgi serial will be off air soon Netra fame actress Titiksha Tawde shared video

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ

अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची मुख्य भूमिका असलेली ‘लक्ष्मीनिवास’ ही मालिका लवकरच झी मराठीवर सुरु होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला. या मालिकेचा नवा प्रोमो पाहून कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दोन वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. अखेर या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसत आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम नेत्रा म्हणजेच तितीक्षा तावडेच्या एका पोस्टने याबद्दलच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi serial will be off air)

नेत्रा फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसंच मालिकेच्या काही अपडेट्सही देत असते. अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने नेत्राच्या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओखाली तिने “निरोप घेणे कठीण आहे” असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असण्याबरोबरच तितीक्षाचं युट्यूब चॅनेलही आहे, यावर ती तिच्या दैनंदीन जीवनातील काही अपडेट्स आणि खास क्षण शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

नुकताच तिने ऐश्वर्या नारकरांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने ऐश्वर्या नारकरांच्या सेटवरील वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन अआय सरप्राइजची झलक शेअर केली होती. याच व्हिडीओमध्ये तिने मालिकेचे शेवटचे आऊटडोर शूटिंग असल्याचे म्हटलं होतं. यामुळेही मालिकेच्या निरोपांच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. अर्थात मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांवर अद्याप वाहिनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांमुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.    

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’मधून मिळालेल्या पैशांचं छोट्या पुढारीने काय केलं?, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, आईही भारावली

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका मागील दोन वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीमध्ये आहेत. झी मराठी वाहिनीवरील टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या मालिकेमध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका टॉपला आहे. मालिकेची आगळीवेगळी कथा व कलाकारांचा सशक्त अभिनय यामुळे गेली दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. मात्र अखेर दोन वर्षांनी ही मालिका आता निरोप घेणार आहे.

Tags: Marathi Serial Entertainment Newssaatvya mulichi saatvi mulgiSatvya Mulichi Satavi Mulgi serial will be off airZee Marathi channel Satvya Mulichi Satavi Mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Vikrant Massey starrer The Sabarmati Report movie is now releasing on OTT platform Zee-5

विक्रांत मेस्सीचा बहुचर्चित 'द साबरमती रिपोर्ट' आता ओटीटीवर येणार, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.