झी मराठी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर असत एकापेक्षा एक मालिका प्रक्षेपित करत झी मराठी ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. झी मराठी वरील मालिकांपैकी गाजलेली मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. कोकणात शूट झालेली हॉरर मराठी मालिका प्रेक्षकांना चालीचं आवडली. मालिकेचा दुसरा भाग ही परीक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला. मालिकेतील शेवंता आणि आण्णा नाईक हि पात्र प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत.(Chandravilas)
जो विषय प्रेक्षकांच्या आवडीचा तो झी मराठी घेऊन येणार नाही असं होणार नाही. असाच हॉरर प्रकारातील अजून एक मालिका झी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘चंद्रविलास’ असं मालिकेचं नाव असून अभिनेता वैभव मांगले या मध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. चेटकिनेची मजेशीर भूमिका साकारल्या नंतर वैभव मांगले पुन्हा एकदा भयावह रूपात दिसणार आहे.
नक्की काय आहे विषय(Chandravilas)
झी मराठी च्या ऑफिशीयल इंस्टाग्राम अकॉउंट वरून ही माहिती पोस्ट करण्यात आली असून त्या सोबत वैभव मांगले यांचा एक फोटो पोस्ट करण्यात आलाय. फोटोच्या कॅप्शन मध्ये
” भीतीच्या विश्वात येणार जिवंत नाती….काही अतृप्त इच्छा काही रक्ताच्या गाठी…नियतीचे फासे उलटे पडणार का? जाणून घेण्यासाठी पहा – ‘चंद्रविलास’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर २७ मार्च पासून रात्री ११ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Chandravilas)

२०० वर्ष पासून बंद असलेल्या एका वाड्यात आणि त्यात असलेल्या एका आत्म्याची ही कथा असल्याचं समजतंय. आणि या वाड्यात राहायला आलेल्या एका बाप लेकीची ही कथा आहे. तर या बापलेकीच्या नात्याला वास्तूतील आत्म्याचा त्रास होणार का? त्यांचा इथे निभाव कसा लागणार हे पाहून रंजक ठरणार आहे. तर प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेला वैभव मांगले यांचा भयानक पेहराव ही प्रेक्षकानाच्या विशेष पसंतीस उतरेल एवढं नक्की.
====
हे देखील वाचा – ‘म्हणून सगळ्या ट्रॉफीज विकाव्या लागल्या…..’ स्नेहल ने सांगितली ती भावुक आठवण
====
या आत्म्याशी बाप लेक कसा लढा देणार? आत्म्याला नक्की काय हवं आहे? का तो अडकून पडला आहे या वाड्यात? आता पुढे आणखी कोण या वाड्यात येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर २७ मार्च पासून रोजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. सोबतच मालिकेत अजून कोण कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार आहे हे पाहणं ही रंजक असणार आहे.