गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका हिंदीतही येणार, नावही समोर, कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
मे 27, 2024 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Zee Marathi Channel's serial 'Satvya Mulchi Satavi Mulgi' is now coming in Hindi see the details

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका हिंदीतही येणार, नावही समोर, कुठे पाहता येणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकाने व कलाकारांच्या उत्तम अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अशातच आता ही मालिका हिंदीतही येणार आहे.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या हिंदी रिमेकबद्दल नुकतीच घोषणा करण्यात आली असून याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ‘मराठी सीरियल्स’ या इन्स्टाग्राम पेजद्वारे या मालिकेच्या हिंदी रिमेकबद्दलची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टखाली “झी मराठीवरील हिट मालिका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ आता हिंदीमध्येही येणार आहे आणि याचे नाव ‘सातवे लडकी की सातवी बेटी’ असं नाव आहे. ही मालिका ‘& टीव्ही (अँड टीव्ही)वर प्रसारित केली जाईल” असंही म्हटलं आहे.  

View this post on Instagram

A post shared by Marathi Serials Official (@marathiserials_official)

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका सध्या रंगतदार वळणावर आली आहे. नेत्रा आणि विरोचकमध्ये वार-पलटवार सुरू आहे. सस्पेन्स, थ्रिलर असलेल्या मालिकेत रोजच नवीन व वेगवेगळे ट्विस्ट येत असतात. त्यामुळे ही मालिका सर्वांच्याच पसंतीस पडते. अशातच मालिकेत सध्या पंचपिटीकेचा शोध सुरु आहे. राजाध्यक्ष कुटुंबियांसह रुपालीही या पंचपिटीकेचा शोध घेत आहे.

आणखी वाचा – “रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची…’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला…”

या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील मुख्य पात्राला भविष्य दिसत असल्याने तिला वाईट समजलं जातं. अशी कथा असणारी ही एकमेव मालिका नाही. झी मराठीवरील ही मालिका बंगाली मालिका ‘त्रिनयनी’ची रिमेक आहे. येत्या २७ मे पासून ही मालिका प्रेक्षकांना ‘& टीव्ही’ (अँड टीव्ही)वर पाहता येणार आहे.

आणखी वाचा – ‘धडक २’ चित्रपटाची मोठी घोषणा, मात्र जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत नाही, दोन नवीन कलाकार दिसणार

दरम्यान, या मालिकेत तितीक्षा तावडे व  अजिंक्य ननावारेच्या मुख्य भूमिका आहेत. त्यांच्याशिवाय या मालिकेत ऐश्वर्या नारकर, श्वेता व राहुल मेहंदळे, अजिंक्य जोशी, जयंत घाटे यांसह अनेक कलाकारांच्या महत्त्वपपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेच्या हिंदी रिमेकबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून या मालिकेत कोणते काळककार  पाहायला मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sarkate Kelvan
Entertainment

Video : अनुष्का सरकटेच्या केळवणाचा न्याराच थाट, ‘वचन दिले तू मला’ मालिकेची टीम हजर, खास पदार्थ अन्…

जून 18, 2026 | 10:29 am
 rakhi sawant latest video
Entertainment

४८ वर्षांची आहे राखी सावंत?, वेस्टर्न लूक पाहून नेटकरी अवाक, ट्रोलही केलं, म्हणाले, “ती स्वस्त…”

जून 18, 2026 | 9:58 am
Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Next Post
Ashwini Kasar Shared Experience

"दादर पोलीस स्टेशनमध्ये…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लोकल ट्रेनमध्ये मिळालेल्या वाईट वागणुकीची पोलिसांनी घेतली दखल, म्हणाली, "मॅसेज, कॉल्स करुन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.