बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘धडक २’ चित्रपटाची मोठी घोषणा, मात्र जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत नाही, दोन नवीन कलाकार दिसणार

Saurabh Moreby Saurabh More
मे 27, 2024 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dhadak 2, produced by Karan Johar, starring Siddhant Chaturvedi and Tripti Demary in announcement

‘धडक २’ चित्रपटाची मोठी घोषणा, मात्र जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत नाही, दोन नवीन कलाकार दिसणार

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी मनोरंजन विश्वात अक्षरश: धुमाकूळ घातला. मराठी मनोरंजन विश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाचे हिंदीसह अनेक भाषांत रिमेक झाले. बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला होता. २०१८ मध्ये जान्हवी कपूर व इशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही. अशातच आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

धर्मा प्रोडक्शनचा नवीन चित्रपट ‘धडक-२’ ची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातील फक्त अभिनेत्याची नव्हे तर प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. निर्माता करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली असून या पोस्टखाली “ही गोष्ट थोडी वेगळी आहे. एक होता राजा आणि एक होती राणी… त्यांची जात वेगळी होती… गोष्ट संपली. (‘यह कहानी थोड़ी अलग है, क्योंकी एक राजा था और एक रानी थी, जाति अलग थी… कहानी खत्म।’) असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा –

आणखी वाचा – “आई कधीच झाले नाही कारण…”, विवाहित पुरुषाशी लग्न, कधीही बाळ न होण्याबाबत अरुणा ईराणींचा खुलासा, म्हणालेल्या, “माझं दुःख…”

‘धडक-२’मध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व अभिनेत्री तृप्ती डिमरी हे मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कथानकाची झलकही दिसून येत आहे. ‘धडक’ चित्रपटात जातीवादात अडकलेल्या प्रेमावर भाष्य करण्यात आले होते. अशातच आता पुन्हा एकदा ‘धडक-२’ च्या माध्यमातून करण जोहरचा हा चित्रपट जाती व्यवस्थेवर भाष्य करणार असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा – “रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची…’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला…”

दरम्यान, ‘धडक-२’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल असं जाहीर करण्यात आलं आहे. ‘धडक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केले होते. जान्हवी कपूर व ईशान खट्टर यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आता ‘धडक-२’च्या माध्यमातून तृप्ती दीमरी व सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार दिसणार आहेत.   

Tags: Bollywood entertainment newsbollywood movieDhadak 2
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Zee Marathi Channel's serial 'Satvya Mulchi Satavi Mulgi' is now coming in Hindi see the details

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका हिंदीतही येणार, नावही समोर, कुठे पाहता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.