शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा येणार?, निलेश साबळेने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, म्हणाला, “आता फक्त…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 28, 2023 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
zee marathi chala hawa yeu dya comedy show will be start again dr nilesh sabale shared video on social media

'चला हवा येऊ द्या' पुन्हा येणार?, निलेश साबळेने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, म्हणाला, "आता फक्त..."

झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या लोकप्रिय शोने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केले. ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा पहिला एपिसोड २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दरम्यान नुकतंच या शो ने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. टीआरपीच्या कारणांमुळे हा शो बंद झाल्याचे म्हटले गेले. त्यामुळे चाहते नाराज झाले होते. मात्र छोट्याश्या विश्रांतीनंतर हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. यासंदर्भात नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे आणि सध्या सोशल मीडियावर सर्वत्र या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे. (Dr. Nilesh Sabale Shared Video On Instagram)

डॉ. निलेश साबळे हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. अशातच त्यांनी या शोसंदर्भात एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी ‘चला हवा येऊ द्या’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती दिली आहे. या व्हिडीओत त्यांचसह अभिनेते भाऊ कदम हेदेखील आहेत. या व्हिडीओत भाऊ “मी पुन्हा येतोय, मी पुन्हा येतोय.. ‘चला हवा येऊ द्या’ आता सोमवार ते शनिवार” असं म्हणत आहेत. यापुढे भाऊंना दुजोरा देत निलेश असं म्हणतो, “बरोबर ऐकताय तुम्ही, चला हवा येऊ द्या आता फक्त सोमवार, मंगळवारीच नाही, तर सोमवार ते शनिवार म्हणजेच संपूर्ण आठवडाभर असणार नवेकोरे एपिसोड्स. तेव्हा पाहायला विसरू नका ‘चला हवा येऊ द्या’ सोमवार ते शनिवार” असं म्हणतो.

View this post on Instagram

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

आणखी वाचा – “मी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिला तेव्हा…”, अखेर डीपफेक व्हिडीओबाबत रश्मिका मंदाना माध्यमांसमोर बोलली, म्हणाली, “हे प्रकरण काही…”

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा शो बंद झाल्याचे कळले तेव्हा शोच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र हा शो आता पुन्हा एकदा टीव्हीवर येत असल्याने चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे. तसेच शो च्या पुनरागमनाने चाहते चांगलेच खुश झाले असून या शो ची ते पुन्हा एकदा आतुरतेने वाट बघत आहेत हे नक्की.

आणखी वाचा – भर कार्यक्रमात ‘देवाक काळजी’ गाणं न म्हणता आल्यामुळे मधुराणी प्रभुलकर ट्रोल, नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, “गायिका असूनही…”  

या शोच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम (भालचंद्र कदम), सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे यांसारखे अनेक विनोदवीर घराघरांत पोहोचले. या कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली. दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या पुनरागमनामुळे हे सगळे विनोदवीर पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाले आहेत.

Tags: chala hawa yeu dyaChala Hawa Yeu Dya Show Updateentertainment newsmarathi actormarathi entertainmentmarathi showsnilesh sable
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Sayaji shinde talk about sindoor operation
Entertainment

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं”, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य, नक्की काय म्हणाले?

मे 8, 2025 | 3:06 pm
Next Post
Amruta Deshmukh Mother Post

"अंगात १०० ताप असताना…", अमृता देशमुखच्या आईने सांगतली लेकीची कशी झालेली अवस्था, खुलासा करत म्हणाल्या, "तेव्हा प्रसाद, डॉक्टर आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.