कलाकारांना वेळोवेळी त्यांच्या अभिनयासाठीची पोचपावती मिळतच असते. कधी ती सोशल मीडियावरून मिळत असते तर कधी प्रेक्षक वेळोवेळी सांगताना दिसतात. पण तशीच पोचपावती नेहमी मिळत असते ती दरवर्षी वाहिनीकडून मिळणाऱ्या अवॉर्ड सोहळ्यातून मिळते. त्यामुळे मालिकांमधील सर्व कलाकार पारितोषिक सोहळ्याची वाट पाहताना उत्सुक असतात. असाच भव्य अवॉर्ड सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही ‘झी मराठी’ने आयोजित केला आहेत. विविध मालिकेतील कलाकार यासोहळ्यात उपस्थित होते. मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय नारकर कपल यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांच्या मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या मंगळसूत्राबाबत उलघडा केला. (aishwarya narkar mangalsutra different design)
‘झी मराठी नात्यांचा उत्सव २०२३’ मध्ये सगळे कलाकार अगदी तयार होऊन आले होते. त्यात नारकर कपलचा लूक नेहमी प्रमाणे लक्षवेधी ठरला. त्यांचा पारंपारीक लूक साधा पण खूपच मोहक वाटत होता. विशेष म्हणजे ऐश्वर्या यांनी घातलेलं मंगळसूत्र हे सगळ्यांचं विशेष लक्षवेधून घेत होतं. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “हे मंगळसुत्र अविनाश यांनीच एका पाडव्याचं गिफ्ट म्हणून दिलं होतं. नेहमी हे एवढं मोठं घातलं जातं नाही. पण आज दिवाळीच्या निमित्ताने घातलं गेलं आहे. हे या लूकला शोभूनही दिसत आहे. म्हणून ते हे एकच पण ठसठशीत घातलं आहे”.
या पाडव्याच्या गिफ्टबाबत विचारलं असता त्यांनी खूप मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे. ऐश्वर्या त्यावर म्हणाल्या, “माझी अजून या पाडव्याची लिस्ट द्यायची आहे”. अविनाश यांनीही ऐश्वर्या यांना कोणतही गिफ्ट देताना खूप आनंद होतो असं स्पष्ट केलं. अविनाश म्हणाले, “तिला गिफ्ट देणं मला खूप आवडतं. कधी तिची अपेक्षा नसते पण त्यावेळेलाच तिला गिफ्ट देणं याच्यामध्ये काही वेगळीच गंमत असते. ते नेहमीच एक माझ्याकडून व तिच्याकडूनही सरप्राईज असते”, असं सांगत अविनाश यांनी त्यांच्या नात्यातील गोडव्याबद्दल सांगितलं.
नारकर कपल सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये आपल्याला दिसतात. ऐश्वर्या नारकर या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. तर अविनाश नारकरही ‘३६ गुणी’ जोडी मालिकेत महत्त्वाचं पात्र साकारत आहेत.