बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने केळवण, होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 7, 2023 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ira khan and nupur shikhare pre wedding functions

ira khan and nupur shikhare pre wedding functions

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या घरात लवकरच लगीनघाई सुरु होणार आहे. लवकरच आमिरची मुलगी इरा खान तिच्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. पुढच्या वर्षी ३ जानेवारी २०२४ला हे जोडपं लग्न करणार असून सध्या आमिरच्या मुलीची लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. शुक्रवारी इराच्या व नुपूरच्या लग्नाच्या लग्नाआधीच्या विधीला सुरुवात झाली. काल या दोघांचं पहिलं केळवण पार पडलं. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. (ira khan and nupur shikhare pre wedding functions)

इराने काही काळ नुपुरला डेट केल्यानंतर या दोघांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये साखरपुडा उरकला. आता या जोडप्याचा २०२४ मध्ये लग्नाचा मुहुर्त ठरला आहे. त्याअगोदरच्या लग्नाच्या विधींना आता नुकतीच सुरुवात झाली. इराचा होणारा नवरा हा महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन पद्धतीत केळवण हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. कालचा हा सोहळ्या अगदी साध्या पद्धतीत पण धमाकेदार साजरा झाला. यावेळी इराची खासची मैत्रिण अभिनेत्री मिथिला पालकरही तिच्यासह फोटोत दिसली.केळवण या लग्नापूर्वीच्या विधीत वधू व वराकडचे कुटुंब स्वादिष्ट पक्वान्न घेऊन एकमेकांना भेटतात. यावेळी ते एकमेकांना लग्नासाठी आमंत्रित करतात. त्यावेळी एकमेकांना भेटवस्तूही दिल्या जातात. या कार्यक्रमाला दोन्हींकडचे नातेवाईकही उपस्थित होते. त्यांच्याकडूनही या जोडप्यांना भेटवस्तू व आशीर्वाद दिले गेला.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – Aarti Solanki : “मी आईला घरी बसवलं आणि चॅनलने मला…”, ‘तो’ प्रसंग सांगताना आरती सोळंकीला कोसळलं रडू, म्हणाली, “‘फु बाई फु’मुळे मला…”

सध्या इरा व नुपुरच्या केळवाणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत इरा खूप सुंदर दिसत आहेत. तिने गुलाबी- पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. त्याचबरोबर तिने नाकात महाराष्ट्रीयन पद्धतीची मोत्याची नथ घातली होती. तिच्या पुढ्यात पंजपक्वान्न दिसत आहेत. तर नुपुर तिला चमच्याने भरवताना दिसत आहेत. तर एका व्हिडीओत इराने नुपुरसाठी उखाणा घेत त्याला घास भरवला. त्यावेळी ती म्हणते, “मला मराठी येत नाही पण पपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही”, असा खास उखाळा घेतला. या कार्यक्रमाला रीना दत्ता नुपुरची आई प्रीतम शिखरेबरोबर दिसली.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – कंगना रणौत करणार राजकारणात एन्ट्री, द्वारकाधीशचे दर्शन घेत लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत, म्हणाली, “भगवान श्री कृष्णाची…”

हे दोघ ३ जानेवारी २०२४ ला कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यानंतर ते डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूरला जाणार आहेत. त्याचबरोबर आमिरने इरासाठी १३ जानेवारीला मुंबईत एक खास वेडिंग रिसेप्शन आयोजित केलं आहे.

Tags: aamir khanbollywood actorira khankelvan ceremonynupur shikharepre wedding functions
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Prasad Jawade and Amruta Deshmukh Wedding dance reharsals video

Video : प्रसाद जवादे व अमृता देशमुखच्या लग्नापूर्वीच्या तयारीला सुरुवात, डान्स रिहर्सल करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.