मनोरंजनासाठी प्रेक्षकांचे अगदी जवळचे माध्यम म्हणजे टीव्ही आणि टीव्हीवरील मालिका. मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या असतात. अशा मालिकांपैकी म्हणजे एक म्हणजे ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही आहे. आता या मालिकेमध्ये नवे वळण येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे आणि या प्रोमोमधून सिंबा म्हणजेच अमोलकडे आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असल्याचे सांगण्यात आले आहे. (Appi Aamchi Collector New Twist)
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये सुरुवातीला एका मॅडमने अमोलचे कौतुक केल्याचे अर्जुन पोलिस स्टेशनमधील इतर सहकऱ्यांना सांगत आहे तर अप्पीही मला अमोलचा खूप अभिमान वाटतो असं म्हणत सिंबाचे कौतुक करत आहे. पण यापुढे अप्पी असं म्हणते की, अजूनही काही गोष्टी बदलत नाही आहेत”. यानंतर डॉक्टर अर्जुनच्या वाहिनीला अमोल विषयी धक्कादायक सांगते. याबद्दल डॉक्टर अर्जुनला काहीतरी गंभीर आजार झाला आहे असं म्हणत हा आजार दुसऱ्या स्टेजला आहे असंही सांगतात. हे ऐकून अर्जुनच्या वाहिनीच्या पायाखालची जमीनच सरकते.
पुढे घरी आल्यावर अर्जुनची वहिनी असं म्हणते की, “त्याला मी कसं सांगू की त्याच्याकडे फक्त दोनच महिने आहेत”. तिचे हे बोलणे अमोल ऐकतो आणि त्यालाही धक्काच बसतो. आता अमोलला झालेला हा गंभीर आजार नेमका काय आहे? आणि याबद्दल त्याला स्वत:लाच माहिती पडल्यामुळे तो आता यातून कसा बाहेर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी अमोल देवासमोर हात जोडून प्रार्थना करत “मला काही झालं तरी चालेल. पण माझ्या माँ आणि बाबांना एकत्र आण” असं म्हटला होता.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अर्जुन अप्पीला म्हणतो की आपण फक्त अमोलसाठी एकत्र राहायचं. इथून पुढे आपल्यात नवरा-बायकोचं नातं नसेल. ही गोष्ट अमोलला चुकूनही कळाली नाही पाहिजे. मात्र ही गोष्ट अमोल ऐकतो आणि तो बेशुद्ध पडतो. खोलीच्या बाहेर पडणाऱ्या अप्पीला अमोल बेशुद्ध पडलेला दिसतो. त्याला दवाखान्यात दाखल केले जाते. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मालिकेत नेमके पुढे काय होणार?, अमोलला नक्की काय झाले आहे?, अप्पी आणि अर्जुनचे नात्यामध्ये काय बदल होणार? आणि या सगळ्यामुळे मालिकेत कोणते नवे वळण येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.