बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘झी मराठी’च्या कलाकारांसह रंगला आंबा महोत्सव, आंबा-कारलं शॉर्ट्स खेळत उलगडले मजेशीर किस्से

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 25, 2026 | 11:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Zee Marathi Aamba Mahotsav

'झी मराठी'च्या कलाकारांसह रंगला आंबा महोत्सव, आंबा-कारलं शॉर्ट्स खेळत उलगडले मजेशीर किस्से

Zee Marathi Aamba Mahotsav : महाराष्ट्राची महावाहिनी म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करत झी मराठी ‘ने अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आपल्या ‘आंबा महोत्सव २०२६’ च्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन केले होते. फळांचा राजा आंबा आणि मनोरंजनाची राणी झी मराठी यांनी या महोत्सवात कलाकार, पत्रकार आणि मान्यवर मंडळींसोबत अविस्मरणीय अनुभव घेतला. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर झी मराठीने यंदा अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात ‘आंबा महोत्सव’चे दुसरे पर्व सादर केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनची जबाबदारी घेतली होती ती अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री तनिष्का विशे यांनी. या महोत्सवात ‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’, ‘शुभ श्रावणी’, ‘दीपज्योती’, ‘वीण दोघातली हे तुटेना’, ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘तुला जपणार आहे’ या मालिकांमधील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला.

हास्य, आठवणी आणि आंब्यावर आधारित मजेशीर खेळांनी संपूर्ण दिवस रंगून गेला. सर्वात पहिल्या खेळात जोड्या मंचावर अवतरल्या आणि चढाओढ रंगली ती वर टांगलेल्या टोपलीत कोण जास्त लवकर आंबे पोहोचवणार? या खेळात धमाल उडाली. काही जोडप्यांनी खेळात भाग घेतला, तर काहींनी प्रेक्षक म्हणून या मजेचा मनमुराद आनंद लुटला. यानंतर कलाकारांनी “आंबा-कारल शॉट्स” या खेळात दरम्यान सेटवरील अनेक मजेशीर किस्से उलगडले यात आपल्या लाडक्या ज्योतीला कारल्याचा जूस प्यावा लागला. त्यानंतर घरातील मोठ्यांनी पुढाकार घेत आमरस काढण्याची जबाबदारी सांभाळली. आणि आमरस तयार करून त्यांनी आपल्या टीममधील सह कलाकारांना तो चाखायला दिला आणि आपल्या टीमला विजयी बनवले.

आणखी वाचा – “या देशात स्त्री जन्म पाप”, सुप्रसिद्ध अभिनेत्री मोदी समर्थकांवर भडकली, म्हणाली, “धमक्या येतात आणि…”

शेवटी झी मराठीच्या सर्वात छोट्या सदस्यांनी म्हणजेच सावल्याची जणू सावली मालिकेतील अबीर आणि ओवी यांनी “आंबा-पाणी” हा खेळ रंगवला. या खेळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग घेत जल्लोष केला. एकूणच, आंबा महोत्सवात प्रत्येक जण उत्साह, आनंद आणि धमाल मस्तीमध्ये रंगून गेला. खेळांतील विजेत्यांना आणि सर्व कलाकार, पत्रकार मित्रांना हापूस आंब्यांची भेट देण्यात आली, ज्यामुळे उत्सवाची गोडी आणखी वाढली.

आणखी वाचा – हातात हिरव्या बांगड्या, गळ्यांत मंगळसूत्र आणि…; बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, फोटो पाहून चाहते हैराण

याच मंचावरून झी मराठीने त्यांच्या आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ ह्या मालिकेचा नवीन प्रोमो पत्रकार आणि प्रेक्षकांसमोर आणला. या मालिकेतून बहुआयामी आणि जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ ‘कृष्णा आई’ची भूमिका साकारणार आहेत. तसेच, या ‘आंबा महोत्सवात’ आणखी काही खास चाहूलही लागली असून महाराष्ट्रातील लाडक्या वहिनींसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे ‘दार उघड बये’ म्हणत झी मराठी लवकरच कोणीतरी येणार आहे. याचसोबत मराठी Z5 ला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदही येथे साजरा करण्यात आला आणि वाहिनीने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
Tumbadchi Manjula New Song

‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे भावस्पर्शी गाणं प्रदर्शित, कलाकारांच्या अभिनयाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.