kangana ranaut marriage : कंगना रणौतने गुपचूप लग्न केले आहे का? अभिनेत्रीचे नुकतेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या आणि यूजर्सच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक, कंगना नुकतीच गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या घातलेली दिसली. अभिनेत्रीची ही स्टाईल पाहून कंगनाने गुपचूप लग्न केले का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तू कोणाशी आणि कधी लग्न केलेस?, असंही अनेकजण विचारत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कंगना रणौत घरातून बाहेर पडून तिच्या कारकडे जाताना दिसत आहे, तर सुरक्षा पथकाने तिला घेरले आहे. कंगनाने फिकट गुलाबी रंगाचा सूट घातला असून तिच्या कपाळावर सिंदूर लावलेला दिसला. यावेळी कंगनाची नजर पापाराझींवर पडली, मात्र ती त्यांच्याशी बोलली नाही आणि गप्प राहिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
एकाने लिहिले, ‘मंगळसूत्र? कंगनाचे लग्न झाले?”. एकाने कमेंट केली, “कदाचित ती शूटिंग करत होती”. काही लोक कंगना गुपचूप लग्न करत असल्याचा कयास लावत आहेत, तर काहींचं म्हणणं आहे की अभिनेत्री एका चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. काहींनी तर कंगनाचा हा विवाहित लूक तिच्या पुढच्या ‘तनु वेड्स मनू 3’ या चित्रपटासाठी आहे किंवा कदाचित ती ‘क्वीन 2’ ची शूटिंग करत असल्याचा दावाही केला आहे. ‘क्वीन फॉरएव्हर’ या नावाने हा चित्रपट बनवला जात आहे. मात्र, आतापर्यंत कंगना रणौत किंवा तिच्या टीमकडून या वेडिंग लूकबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही किंवा लग्नाच्या बातमीवर कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसे, असे सांगितले जात आहे की अभिनेत्रीने मुंबईत ‘क्वीन 2’ चे शूटिंग सुरु केले आहे. त्याच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्याने ‘क्वीन 2’ची तयारी सुरु केली.

कंगना रनौत सध्या ३९ वर्षांची असून ती सिंगल लाईफ जगत आहे. मात्र, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. कंगनाने जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून तिचे नाव चिराग पासवानसोबत जोडले गेले. जेव्हाही ती चिरागसोबत दिसते तेव्हा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. याच कारणावरून चिराग पासवान आणि कंगना यांच्यात अफेअर असल्याचा दावा केला जात होता.
आणखी वाचा – रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘तुंबाडची मंजुळा’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित, कलाकारांचा दमदार अभिनय
चिराग पासवानसोबतच्या अफेअरच्या अफवांवर कंगनाचे वक्तव्य
मात्र, ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने ही गोष्ट फेटाळून लावत सांगितले की, “रोमान्स… आम्ही 10 वर्षांपूर्वी एकत्र एक चित्रपट केला होता. रोमान्स असता तर आज मुलं झाली असती. आमच्यात रोमान्स व्हायला हवा होता तर झाला असता”. कंगना आणि चिराग पासवानने 2011 मध्ये ‘मिले ना मिले हम’ या चित्रपटात काम केले होते.





