शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे भावस्पर्शी गाणं प्रदर्शित, कलाकारांच्या अभिनयाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 26, 2026 | 10:01 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tumbadchi Manjula New Song

‘तुंबाडची मंजुळा’मधील ‘देवा मला पाव की रे’ हे भावस्पर्शी गाणं प्रदर्शित, कलाकारांच्या अभिनयाने वेधलं लक्ष

Tumbadchi Manjula New Song : ‘झी स्टुडिओज’च्या बहुचर्चित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटातील आता आणखी एक खास आणि मनाला भिडणारं गाणं ‘देवा मला पाव की रे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं भावविश्वाला स्पर्श करत थेट मनात घर करणारं आहे. सई ताम्हणकरवर चित्रित या गाण्यात ईश्वराकडे मनापासून केलेली प्रार्थना, संकटाच्या काळात देवाकडे धाव घेणाऱ्या मनाची आर्त हाक आणि श्रद्धेची भावनिक गुंफण या गाण्यातून अनुभवायला मिळते. कधी आयुष्यातील संकटं, कधी असहायता तर कधी मनातील वेदना अशा अनेक भावनांनी भरलेल्या क्षणी मन देवाकडे धाव घेतं. हीच भावना या गाण्यात सुंदरपणे मांडण्यात आली आहे. गाण्याचे शब्द, सूर आणि गायन या तिन्ही माध्यमांतून सायली खरे यांनी या गाण्याला एक वेगळीच आत्मीयता दिली आहे. ‘देवा मला पाव की रे’ या गाण्याची गीतकार, संगीतकार व गायन अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. या गीतातील भावनांचा गहिरा प्रवास आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते. हे गाणं मनातील भावना आणि देवाशी संवाद साधणारी एक प्रार्थना म्हणून समोर येतं.

गायिका सायली खरे म्हणतात, “१३ वर्षापूर्वी एका प्रोजेक्ट निमित्त या गाण्याचं पहिलं रेकॉर्डिंग झालं, तेव्हा विविध कोरगावकरने ते ऐकलं होतं. त्यावेळी त्याने मला शब्द दिला की, ‘मी जेव्हा माझा पहिला चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा त्यात हे गाणं नक्की असेल.’ मीही त्याला लगेच होकार दिला. यानंतरच्या काळात मी अनेक चित्रपट आणि संहितांवर काम केलं. बऱ्याचदा हे गाणं इतर प्रोजेक्ट्ससाठी पाठवूनही काही ना काही कारणाने ते तिथे फिट बसलं नाही. पण कदाचित परमेश्वराला विविधने दिलेला तो शब्द पूर्ण करायचा होता, म्हणूनच अखेर या चित्रपटाच्या माध्यमातून हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं. त्यानंतर या प्रक्रियेत बवेश सर आले, त्यांनी गाण्याला आणखी अचूक दिशा दिली.”

आणखी वाचा – ‘झी मराठी’च्या कलाकारांसह रंगला आंबा महोत्सव, आंबा-कारलं शॉर्ट्स खेळत उलगडले मजेशीर किस्से

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, “देवा मला पाव की रे या अत्यंत संवेदनशील अशा गाण्यासाठी आम्हाला एक असा आवाज हवा होता ज्याद्वारे या गाण्याचा प्रत्येक शब्द आणि त्यातील भावना प्रेक्षकांपर्यंत अचूकपणे पोहचेल. यासाठी सायली खरे यांचा आवाज अतिशय योग्य असाच होता. त्यांच्या आवाजात असलेला ‘ठहराव’ ही या गाण्याची गरज होती. या चित्रपटाची एक संवेदनशील बाजू या गाण्यातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. हे गाणं प्रत्येक रसिक प्रेक्षकाला आवडेल असा विश्वास आहे.” दिग्दर्शक विविध कोरगांवकर म्हणतात, ”‘देवा मला पाव की रे’ हे गाणं चित्रपटातील पात्रांच्या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा शब्द संपतात आणि मन देवाशी बोलू लागतं. त्या भावनेला पडद्यावर आणि संगीतामध्ये प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही या गाण्यातून केला आहे ”.

आणखी वाचा – “या देशात स्त्री जन्म पाप”, सुप्रसिद्ध अभिनेत्री मोदी समर्थकांवर भडकली, म्हणाली, “धमक्या येतात आणि…”

५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट रहस्य, विनोद आणि भन्नाट कथानकाचा अनोखा संगम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केलं असून कथा आणि लेखनाची जबाबदारी ऋषिकेश तुरई यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे. वेगळ्या कथानकासोबतच चित्रपटातील कलाकारांची दमदार फळी हे देखील या चित्रपटाचं खास आकर्षण ठरणार आहे. जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांसारखे कलाकार आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एक वेगळीच रंगत आणताना दिसणार आहेत.

Tags: marathi movieTumbadchi ManjulaTumbadchi Manjula new song
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
divyanka tripathi dahiya blessed with twins babies

करण-अर्जुन आले! सुप्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या १० वर्षांनी झाली आई, जुळ्या बाळांना दिला जन्म

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.