Yuzvendra Chahal Spotted With Mystery Girl : कोरिओग्राफर व डान्सर धनश्री वर्मा आणि भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. धनश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः क्रिकेटर युजवेंद्रच्या चाहत्यांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले असल्याने या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. मात्र, दोघांनीही घटस्फोट किंवा वेगळे होण्याची घोषणा अद्याप केलेली नाही. दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लबरोबर दिसला आहे ज्यामुळे क्रिकेटर धनश्रीपासून घटस्फोट घेत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे.
युजवेंद्र चहलला मुंबईतील एका हॉटेलबाहेर मिस्ट्री गर्लबरोबर दिसल्याचे बोलले जात आहे. ‘द न्यू इंडियन’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, युजवेंद्र बॅगी लाइट ब्लू जीन्ससह कॅज्युअल व्हाइट ओव्हरसाइज टी-शर्ट घालून कूल अंदाजात दिसत होता. त्याच्यासह एक मिस्ट्री गर्लही दिसली, जिने गडद हिरव्या रंगाचा ओव्हरसाईज स्वेटशर्ट घातलेला दिसला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये युजवेंद्र चहलबरोबर असलेली ही मुलगी कोण आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पण एंटरटेनमेंट पोर्टलचा दावा आहे की जेव्हा पापाराझींनी युजवेंद्रला हॉटेलच्या बाहेर या मिस्ट्री गर्लबरोबर पाहिले तेव्हा क्रिकेटरने आपला चेहरा लपवला. त्यामुळे घटस्फोटादरम्यान क्रिकेटर असा स्पॉट होताच चाहत्यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. २०२३ पासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. २०२३ मध्ये, धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरुन ‘चहल’ हे आडनाव काढून टाकले होते ज्यामुळे तिच्या क्रिकेटरबरोबरच्या घटस्फोटाची बातमी आली होती. मात्र नंतर चहलने या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हणत पूर्णविराम दिला.
काही दिवसांपूर्वी धनश्री आणि चहलने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले, त्यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. या बातम्यांवर जोडप्याने मौन बाळगले असल्याचं पाहायला मिळत आहे. आता युजवेंद्रबरोबर असलेली ती मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे?, याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.