सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खानने आज बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती कायम आपले नवनवीन फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. स्टायलिश लूकमधील तिचे फोटो व व्हिडीओ कायमच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. अशातच अभिनेत्रीने नुकतेच शेअर केलेले नवीन फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सारा अली खानने आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली. (Sara Ali Khan visit Srisailam Mallikarjuna Jyotirlinga)
श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे खास फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सोमवारी ती मंदिरात पोहोचली आणि या दर्शनाचे फोत तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. याआधी तिने काही देवस्थानांना भेटी दिल्या आहेत आणि या भेटीचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. अशातच तिच्या या श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाच्या फोटोंची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर हिट ठरल्यानंतर ‘मुफासा : द लायन किंग’ ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी व कुठे पाहता येणार?
“साराचा वर्षातील पहिला सोमवार, जय भोलेनाथ” असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. यावेळी अभिनेत्रीच्या कपाळावर चंदनाचा टिळक लावल्याचा पाहायला मिळाला. तर यावेळी ती साध्या पांढऱ्या ड्रेसध्ये असून तिने डोक्यावर ओढणीही घेतल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सारा अली खानने यापूर्वी केदारनाथ, उज्जैनचे महाकाल आणि वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरातील दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. तिने अमरनाथ गुहेच्या भेटीचा व्हिडिओही शेअर केला आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, व्हिडीओद्वारे व्यक्त केला आनंद
दरम्यान, साराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सारा शेवटची ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटामध्ये दिसली होती. यानंतर ती लवकरच २४ जानेवारी रोजी ‘स्काय फोर्स’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे त्यानंतर सारा आदित्य रॉय कपूरबरोबर ‘मेट्रो… देज डेज’ दिसणार आहे. शिवाय आयुष्मान खुरानाबरोबरही ती एक चित्रपट करणार आहे, मात्र ज्याचे नाव अद्याप ठरलेले नाही.