गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अल्लू अर्जुननंतर राम चरणच्या चित्रपटाच्या इव्हेंटमधून परतताना दोन चाहत्यांचा मृत्यू, निर्मात्यांनी देऊ केली १० लाखांची मदत अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 7, 2025 | 10:26 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ram Caharn 2 Fans Died

अल्लू अर्जुननंतर राम चरणच्या चित्रपटाच्या इव्हेंटमधून परतताना दोन चाहत्यांचा मृत्यू, निर्मात्यांनी देऊ केली १० लाखांची मदत अन्…

Ram Caharn 2 Fans Died : आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे साऊथ सुपरस्टार राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या प्री-रिलीझ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर दोन चाहत्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी, ४ डिसेंबर रोजी घडली. या कार्यक्रमाला अभिनेता व उपमुख्यमंत्री पवन कल्याण देखील उपस्थित होते. या घटनेनंतर चित्रपट निर्माता दिल राजू यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. वृत्तानुसार, दोन्ही चाहत्यांना पेद्दापुरम रुग्णालयात नेण्यात आले, परंतु गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जीव वाचवणं अशक्य झालं. याप्रकरणी रंगमपेटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा ‘गेम चेंजर’ १० जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी त्याचा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. आंध्र प्रदेशात झालेल्या या कार्यक्रमाला अभिनेत्याचे दोन चाहते आले होते. अर्वा मणिकांत (२३) आणि ठोका चरण (२२, रा. गायगोलुपाडू, काकिंडा) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

आणखी वाचा – Video : उमेश कामतने खरेदी केली महागडी दुचाकी, पहिल्यांदाच व्लॉगही केला शूट, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव

शनिवारी ४ जानेवारीच्या रात्री कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका व्हॅनने त्यांना धडक दिली. या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या दिल राजूने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊस श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरील पोस्ट पाहायला मिळाली. ज्यात त्यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करत १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि मदतीचे आश्वासन दिले

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, व्हिडीओद्वारे व्यक्त केला आनंद

शिवाय, दिल राजूने शोक व्यक्त करत असं म्हटलं की, “मला नुकतेच कळले की कार्यक्रमानंतर परतत असताना दोन लोकांचा दुःखद मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि आम्ही दोन्ही कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा देऊ अशी मी प्रार्थना करतो. मी ताबडतोब प्रत्येकी ५ लाख रुपये पाठवत आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन देतो”. पवन कल्याण यांनीही पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags: Ram Caharn 2 Fans Diedram charansouth news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Yuzvendra Chahal Spotted With Mystery Girl

युजवेंद्र चहल व धनश्री वर्माच्या घटस्फोटाला 'ती' जबाबदार?, क्रिकेटरसह मिस्ट्री गर्ल हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.