Armaan Malik Wife : ‘बिग बॉस ओटीटी ३’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेले नाव म्हणजे अरमान मलिक. अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दोन विवाहसोहळ्यामुळे अरमान मलिकला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अरमानच्या दोन बायका पायल मलिक आणि कृतिका मलिक एकत्र राहतात. दोघेही बहिणींसारखे एकाच छताखाली राहतात. पायल आणि कृतिका घर संभाळण्याशिवाय व्यवसायाकडेही लक्ष देतात. पण आता या दोन बहिणींसारख्या राहणाऱ्या सवतींमध्ये खूप मोठी दरार आली आहे. पायल आणि कृतिकाच्या नात्यात वादाची ठिणगी पडली आहे.
सारखेच कपडे परिधान करणाऱ्या या दोन सवती नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. दोघीही अरमानबरोबर कमी आणि एकमेकींसह अधिक एकत्र असताना दिसतात. परंतु आता दोघांनीही त्यांच्या या जाबदाऱ्या विभक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अरमानने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अरमान मलिकने पायलबरोबर घटस्फोट न घेता कृतिकाबरोबर लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. अरमानचे आधी एक लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर अरमानने कृतिका व पायल यांच्याशी लग्न केले.
आणखी वाचा – “सोफ्यावर बसून कोण पूजा करतं?”, संजय दत्तचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “देवाला…”
अरमान मलिक याने आता त्याच्या दोन्ही बायका वेगळ्या राहणार असल्याचं व्हिडीओद्वारे म्हटलं आहे. त्याने असं म्हटलं आहे की, “पायल आणि कृतिका यांना वेगळं व्हायचं आहे. कृतिका म्हणतेय की ती व्यवसाय सांभाळेल आणि पायल मुलांना घरी सांभाळेल. यानंतर, अरमान पायलला विचारतो, “तुम्ही मुलांना हाताळण्यास तयार आहात का?”. यावर, पायल उत्तर देत म्हणते, “कृतिका जसं म्हणेल मी त्यात आनंदी आहे. मी सर्वत्र आनंदी आहे. मी ऑफिसमध्येही आनंदी आहे आणि मी मुलांसह आनंदी आहे”.
यावर अरमान पुढे म्हणतो, “आतापासून पायल आणि कृतिका दोघेही वेगळ्या प्रकारे दिसून येतील. कृतिका सकाळी कार्यालयात जाईल आणि पायल मुलांना घरी सांभाळेल. आणि मी ब्रॉडकास्ट सांभाळेन”. कृतिकाच्या व्यवसायामुळे आणि पायलच्या संभाळण्यामुळे कृतिकाला ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागलं आहे. नेटकरी म्हणत आहेत, “कृतिकाने आधीच पायलला तिच्या नवऱ्यापासून दूर नेले आहे आणि आता ती तिच्या व्यवसायापासून दूर जात आहे”.
अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींमध्ये वादाची ठिणगी, होणार वेगळ्या, youtuber चा मोठा खुलासा, म्हणाला, “आतापासून…”