Sanjay Dutt Video Troll : अभिनेता संजय दत्त नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. संजय दत्तचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा हटके अंदाज, डॅशिंग लूक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो. आता संजय दत्तच्या समोर आलेल्या एका व्हिडीओने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भूमीपूजनासाठी संजू बाबा कल्याणला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे आणि आता या समारंभाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वास्तविक, संजय दत्त अशा कलाकारांपैकी एक आहे जो पूजा आणि देवावर ठाम विश्वास ठेवतो आणि चाहत्यांना अनेकदा याची झलक दाखवतो. मात्र, यावेळी कॅमेरात जे दिसले ते लोकांना आवडले नाही.
श्रावणातील भोले शंकराची पूजा असो किंवा गोव्यातील पिंडदानाची गोष्ट असो, अशा प्रसंगी संजय दत्त नेहमी मनापासून भक्ती करण्यात रमलेला दिसतो. आता सोशल मीडियावर दिसत असलेल्या या भूमिपूजन व्हिडीओमध्ये संजय दत्त सोफ्यावर बसलेला दिसत आहे. दरम्यान, तेथे उपस्थित पंडित त्यांना पूजाविधी करायला लावत आहेत.
आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, सिनेमॅटिक व्हिडीओद्वारे दिली गुडन्यूज
इथवर सर्व काही ठीक होते, पण सोफ्यावर बसून तो सर्व पूजाविधी करत असल्याबद्दल सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. आता या गोष्टीवर लोक संतापले आहेत. लोक एकच बोलत आहेत की, “तुम्ही जमिनीवर बसले नाहीत का?”, “हा चष्मा घालून पूजा करण्याची नवीन पद्धत कोणती? देवाकडे अशी वृत्ती दाखवू नका”. तर एकजण म्हणाला, “जमिनीवर बसून पूजा केली जाते. प्रत्येकाने अशी पूजा केली आहे, पण तुम्ही करत असणारी अशी पूजा कोण करतं?”, “सोफ्यावर बसून कोण पूजा करतं?”, “देवाला इतकं हल्ल्यात घेऊ नको बाबा”, अशा अनेक कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा – “संन्यासानंतरही अभिनय करणार का?”, ममता कुलकर्णीने दिलं उत्तर, म्हणाली, “चित्रपटसृष्टीत परतणे माझ्यासाठी…”

संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या ‘वास्तव’ या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘वास्तव २’ची सध्या बरीच चर्चा आहे. अनेक वर्षांनंतर या चित्रपटासाठी दिग्दर्शक-अभिनेता जोडी पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांच्याबरोबर एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. २०२५ च्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरु करण्याची योजना आहे. संजयने महेश यांच्याबरोबर ‘कुरुक्षेत्र’, ‘पिता’, ‘हथियार’ आणि ‘विरुद्ध’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.