Sana Khan Son Name : ‘बिग बॉस’ फेम सना खान नेहमीच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री राहिली आहे. सोशल मीडियावर सना कायमच चर्चेत असते. सनाने लग्नानंतर व आई झाल्यानंतर सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतला. मात्र अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच आता सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिच्या पहिल्या मुलाचा जन्म ५ जुलै २०२३ रोजी झाला, त्याचे नाव तिने सय्यद तारिक जमील ठेवले. त्यांनतर तिच्या दुसऱ्या मुलाचा जन्म ५ जानेवारी २०२५ रोजी झाला. मुलगी व्हावी अशी तिची इच्छा होती याबाबत अभिनेत्री व्हिडीओद्वारे व्यक्तही झाली होती.
आता अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या लेकाच्या नावाची घोषणाही केली आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या राजकुमाराचे नाव समोर आले आहे. सना खानने २५ जानेवारी रोजी म्हणजेच मुलाच्या जन्माच्या २० दिवसांनंतर लाडक्या लेकाचे नाव जाहीर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्या स्लाइडमध्ये, सनाने चाहत्यांना आपल्या मुलासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे आणि दुसर्या स्लाइडमध्ये तिने त्याचे नाव सय्यद हसन जमील असल्याचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, सिनेमॅटिक व्हिडीओद्वारे दिली गुडन्यूज
हसन हे अरबी नाव आहे. याचा अर्थ सुंदर, चांगला किंवा फायदेशीर असा होतो. त्याच वेळी, सनाचा मोठा मुलगा तारिक जमील याच्या नावाचा अर्थ मॉर्निंग स्टार आहे. हे देखील एक अरबी नाव आहे. सनाचा संसार आता पूर्ण झाला आहे. ती तिच्या संसारात खूप आनंदी आहे. या जोडप्याने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली होती.
आणखी वाचा – “सोफ्यावर बसून कोण पूजा करतं?”, संजय दत्तचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “देवाला…”
२०२० मध्ये सनाने मुफ्ती अनस सय्यदशी लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला राम राम केला. २०१७ मध्ये त्यांची मक्का येथे भेट झाली. आणि मग त्याची ओळख होत गेली आणि बोलणी सुरु झाली. तथापि, दोघांच्या वयात ७ वर्षांचे अंतर आहे. पण दोघेही एकत्र आनंदी आहेत आणि आज दोन मुलांचे पालक आहेत.