Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : सध्या सर्वत्र मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नाआधीच्या सोहळ्याची चर्चा सुरू आहे. 1 ते 3 मार्च दरम्याने झालेल्या या सोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलिवूड, हॉलिवूडसहित सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. ही तीन दिवसीय कार्यक्रम थीमवर आधारित होते. पहिल्या दिवशी पॉपस्टार गायिका रिहानाचा जबरदस्त परफॉर्मन्स पार पडला. तसेच यामध्ये स्वतः मुकेश व नीता अंबानी यांनीही परफॉर्मन्स दिले. दोघांच्याही नृत्याला व सादर केलेल्या अभिनयाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ व ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम पार पडला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आऊटडोअर कार्यक्रम असून यामध्ये पाहुण्यांना जामनगर, वनताराची सफर घडविण्यात आली. त्यानंतर रात्री भव्य महाआरती व अनंत व राधिकाच्या ‘हस्ताक्षर’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राधिकाच्या ‘ग्रँड एंट्री’ने सर्वांचेच लक्ष वेधले. राधिकाच्या या एंट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये राधिकाने बेज रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. जेव्हा राधिका मंचावर अनंतच्या दिशेने येते तेव्हा तिच्या मागे सुरुवातीला आकाशात फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. त्यानंतर ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘देखा तेनु पहली पहली बार’ या गाण्यावर चालत आली. तेव्हा तिथे उपस्थित असलेले मुकेश अंबानी, नीता अंबानी, श्लोका मेहता,ईशा अंबानी हे कौतुकाने तिच्याकडे बघत होते. मंचावर उभ्या असलेला अनंतही राधिकाकडे प्रेमाने एकटक बघत असलेला दिसून येत आहे. राधिका मंचाजवळ येताच अनंतने तिला हात दिला व मंचावर येण्यासाठी मदत केली. दोघांचा हा सुंदर क्षण कॅमेरामध्ये टिपला गेला. हा व्हिडीओवर सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
‘हस्ताक्षर’ कार्यक्रमासाठी राधिकाने बेज रंगाचा लेहंगा घातला होता तर अनंतने हिरव्या रंगाची शेरवाणी परिधान केली होती. दोघेही एकमेकांबरोबर खूप सुंदर दिसत होते. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते.अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. खूप थाटामाटात हा सोहळा पार पडला.