लहान पडद्यांवरील ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे रुहीची ‘ईशी मा’. इशिता भल्लाच्या भूमिकेमध्ये दिव्यांका घरा-घरात पोहोचली. दरम्यान आता दिव्यांकाच्या तब्येतीबद्दल एक माहिती समोर येत आहे. नुकतीच तिची लिगामेंट सर्जरी झाली असून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टीओणए स्वतः आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. (Divyanka tripathi surgery)
सदर व्हिडीओमध्ये दिव्यांका स्वतः आपलं व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. यामध्ये तिने शस्त्रक्रिया होण्याआधीचा व शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दिव्यांका शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना दिसत आहे. त्यानंतर आपल्या रिकव्हरीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती व्यायाम करतानाही दिसत आहे. तसेच कराटे करताना व स्विमिंग करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनदेखील लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझी शस्त्रक्रिया झाल्यापासूनचा बरं होण्यापर्यंतचा प्रवास. मी माझी दिनचर्या व्यवस्थितपणे फॉलो केली. माझ्या चेहऱ्यावर असलेल्या हास्याचं रहस्य माझे पती आहेत. त्यांनी माझे हास्य जराही कमी होऊ दिलं नाही”, दरम्यान दिव्यांकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तिला बरं होण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
तिच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, “लवकर बरा हो”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले, “पायाची काळजी घे”, तिसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले, “तू खूप स्ट्रॉंग आहेस”. दिव्यांका लवकर बरी व्हावी अशी तिच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.
दिव्यांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २००६ साली तिने ‘बनू मै तेरी दुल्हन’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिला ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. मालिकेमध्ये पोलिसाची भूमिका करणारा विवेक दहिया बरोबर ती २०१६ साली लग्नबंधनात अडकली. मालिकांबरोबरच तिने काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे. आता ती अदृश्यम- द इनव्हिजिबल हिरोज्’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.