गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ये है मोहोब्बते’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझा नवरा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 3, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Divyanka tripathi surgery

‘ये है मोहोब्बते’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझा नवरा...”

लहान पडद्यांवरील ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतील सर्व पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे रुहीची ‘ईशी मा’. इशिता भल्लाच्या भूमिकेमध्ये दिव्यांका घरा-घरात पोहोचली. दरम्यान आता दिव्यांकाच्या तब्येतीबद्दल एक माहिती समोर येत आहे. नुकतीच तिची लिगामेंट सर्जरी झाली असून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टीओणए स्वतः आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. (Divyanka tripathi surgery)

सदर व्हिडीओमध्ये दिव्यांका स्वतः आपलं व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. यामध्ये तिने शस्त्रक्रिया होण्याआधीचा व शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दिव्यांका शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना दिसत आहे. त्यानंतर आपल्या रिकव्हरीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती व्यायाम करतानाही दिसत आहे. तसेच कराटे करताना व स्विमिंग करताना दिसत आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ मधून बाहेर पडल्यानंतर ‘कलर्स मराठी’वर निलेश साबळेचा नवा शो, ओंकार भोजनेसह ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांची दमदार एंट्री

View this post on Instagram

A post shared by Divyanka Tripathi Dahiya (@divyankatripathidahiya)

हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनदेखील लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझी शस्त्रक्रिया झाल्यापासूनचा बरं होण्यापर्यंतचा प्रवास. मी माझी दिनचर्या व्यवस्थितपणे फॉलो केली. माझ्या चेहऱ्यावर असलेल्या हास्याचं रहस्य माझे पती आहेत. त्यांनी माझे हास्य जराही कमी होऊ दिलं नाही”, दरम्यान दिव्यांकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी तिला बरं होण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “आम्ही शेतकऱ्यांकडून घेऊ…”, प्रथमेश लघाटे त्याच्या आंब्याच्या व्यवसायावरुन ट्रोल, नेटकऱ्याला दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला, “स्वतःला ग्रेट म्हणण्यापेक्षा…”

तिच्या या व्हिडीओवर प्रेक्षकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, “लवकर बरा हो”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले, “पायाची काळजी घे”, तिसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले, “तू खूप स्ट्रॉंग आहेस”. दिव्यांका लवकर बरी व्हावी अशी तिच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.

दिव्यांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २००६ साली तिने ‘बनू मै तेरी दुल्हन’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिला ‘ये है मोहोब्बते’ या मालिकेमुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. मालिकेमध्ये पोलिसाची भूमिका करणारा विवेक दहिया बरोबर ती २०१६ साली लग्नबंधनात अडकली. मालिकांबरोबरच तिने काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे. आता ती अदृश्यम- द इनव्हिजिबल हिरोज्’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

Tags: Divyanka tripathiHindi serialtelevision actresstv actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Siddharth Jadhav Special Act

Video : कलाकारांकडे पैसा, प्रसिद्धी पण कुटुंबासाठी वेळ नाही, सिद्धार्थ जाधवच्या सादरीकरणाने उपस्थित कलाकारही रडले अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.