‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे अहिल्यादेवी पारूचा विचार करत असतात त्या म्हणतात की, हरीश माझी निवड आहे हरीश असा मुलगा नाही आहे की, तो भर लग्नातून पळून जाईल असा त्या विचार करतात तितक्यात तिथे दामिनी येते आणि दामिनी आगीत तेल ओतण्याचे काम करते आणि सांगते की, हरीश पारुला सोडून गेला हे खूपच वाईट झालं. याचाच तुम्ही विचार करत आहात ना?, तुम्ही तिला मुलगी मानता आणि तुमच्या मुलीचं दुसऱ्यांदा लग्न मोडलं याचं तुम्हाला वाईट वाटतंय ना? तेव्हा दामिनी असे सांगते की यात नक्कीच चुक पारूची असणार. (Paaru Serial Update)
हरीश व पारू कधी एकमेकांच्या जवळ आलेच नाहीत त्यांना एकमेकांबद्दल काहीच वाटलं नाही त्यामुळे हरीश पारुला सोडून निघून गेला असणार. त्या वेळेला दिशाही तिथे येते आणि मला दामिनी आंटीचं बोलणं बरोबर वाटतं असं म्हणते आणि अहिल्यादेवींच्या हातात एक चिठ्ठी ठेवते आणि सांगते की, ही चिठ्ठी मला हरीशच्या रूममध्ये मिळाली आणि ही चिठ्ठी मी हळदीच्या दिवशी सावित्रीला हरीशला देताना पाहिलं होतं म्हणजे ही चिठ्ठी नक्कीच पारूने दिली असणार. भर हळदीच्या दिवशी दिलेल्या चिट्ठीचा आणखी अर्थ काय होतो असा प्रश्न ती अहिल्यादेवींना विचारते. यावर अहिल्यादेवींचा राग अनावर होतो तर त्याच वेळेला सावित्रीला त्या बोलावून घेतात आणि विचारतात, ही चिठ्ठी तू हरीशला दिली होतीस का?, त्यानंतर तिथे हरिशच्या बालपणीचा मित्र आलेला असतो तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की, आपण यावर नंतर बोलू असं म्हणून त्या त्याला भेटायला जातात.
तर इकडे दामिनी आणि दिशाने आधीच त्याला पैसे देऊन काय बोलायचं आहे त्याबद्दल सांगून ठेवलेलं असतं त्याप्रमाणे तो हरीश बद्दल खोटं सांगत पारू व हरीशच्या नात्याबद्दल भाष्य करतो आणि सांगतो की, पारूचा त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं हे ऐकून तर अहिल्यादेवींचा राग अनावर होतो. त्यानंतर घरातील सगळीच मंडळी तिथे जमतात. तेव्हा आदित्य पारूची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो की, गावाकडून आलेली मुलगी आहे त्यामुळे ती अशी बाहेर त्याच्याबरोबर फिरायला वगैरे जाणार नाही व त्याच्याबरोबर मन मोकळेपणाने बोलणार नाही पण आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा ते दोघे एकमेकांची बऱ्यापैकी काळजी घेताना मला दिसले हे ऐकल्यावर अहिल्यादेवी काहीच बोलत नाही. त्यानंतर अहिल्या देवी थेट पारूला बोलवायला पाठवतात. पारू अहिल्यादेवी समोर येते तेव्हा अहिल्या देवी पारूला एकच प्रश्न विचारतात लग्न म्हणजे काय?, याचे उत्तर दिल्यानंतर पारूला त्या विचारतात, हरीशवर तुझं खरंच प्रेम होतं का?, मात्र या प्रश्नाचे उत्तर पारूकडे नसतं आणि पारु निःशब्द होते. त्यावेळेला मारुतीही याचंही खापर स्वतःवर आणि पारूवरच फाडून घेतो आणि अहिल्या देवींची माफी मागतो.
आता मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय घडणार?, अहिल्यादेवी पारूला शिक्षा करणार का?, हरीशला त्या शोधून आणतील का?, नेमकं सत्य काय आहे ते समोर येणार का?, हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.