रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ची आता महाअंतिम सोहळ्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. अशातच टीव्हीवरील ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाचेदेखील वेध लागले आहेत. सोशल मीडियासह सर्व माध्यमांमध्ये बिग बॉसचे आगामी म्हणजेच १८वे पर्व सुरु होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ‘बिग बॉस’चे हे १८वे पर्व अभिनेता सलमान खान होस्ट करणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चे व सलमान खानचे चाहते आनंदी झाले आहे. या नवीन पर्वाचा प्रीमियर कधी होणार याची तारीखही जाहीर झाली आहे. तसेच यामधील पहिला स्पर्धक कोण असेल हेही समोर आले आहे.
‘द खबरी’च्या रिपोर्टनुसार, सलमान खान होस्ट म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो ‘बिग बॉस १८’ च्या होस्टिंगची नवीन जबाबदारी स्वीकारणार आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात भाईजानच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे, त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने त्याने ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन होस्ट केला नाही. त्यामुळे ‘बिग बॉस’ ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन अनिल कपूर करत आहे, पण ‘बिग बॉस’चे अनेक चाहते ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानला खूप मिस करतात.
आणखी वाचा – नवऱ्याच्या नवीन कामानिमित्त ‘तुला शिकवीन…’ फेम अक्षराची खास पोस्ट, म्हणाली, “खूप अभिमान वाटतो की…”
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस १८’चा पहिला निश्चित झालेला स्पर्धक शोएब इब्राहिम आहे. तो ‘बिग बॉस १२’ ची विजेती दीपिका कक्करचा नवरा आहे. शोएबबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘ससुराल सिमर का’, ‘इश्क में मरजावां’, ‘अजुनी’सारख्या अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने ‘नच बलिये ८’ आणि ‘झलक दिखला जा ११’ सारखे शोदेखील केले आहेत.
दरम्यान, शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी या शोचा प्रीमियर होईल असा दावा केला जात आहे. याआधी, ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ चा महाअंतिम सोहळा ४ ऑगस्ट रोजी होणार आहे आणि हा शो संपल्यानंतर ‘बिग बॉस’चे १८वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये विशाल कटारिया, अरमान मलिक, लव कटारिया, शिवानी कुमारी, सना मकबूल, रणवीर शौरी, कृतिका मलिक, नेझी आणि सई केतन राव हे कलाकार घरात राहिले आहेत.